आयुष्य हे कोडे आहे

कोडे याला इंग्रजीत म्हणतात Puzzle.

अशी कोडी रोज वृत्तपत्रात येतात. काहींना तो छंदच होवून बसतो कोडे सोडविण्याचा.

ते सुटले की त्याचा दिवस आनंदाने जातो.

आमच्या शेजारी रहात असणार्‍या एका वृद्धाने म्हणताना मी ऐकल, आयुष्य हे कोडे आहे. मला ते सोडविण्याची इच्छा झाली.

त्या तंद्रीत असतानाच मला दूरदर्शनवर दोन चित्रफिती पहावयास मिळाल्या.

एक सौ. नीता अंबानी यांची व दुसरी श्रीमती सुधा मूर्ति यांची.
पहिल्या चित्रफितीत सौ. अंबानी यांचा श्रीमंती, श्रीमंतीचा थाटमाट, पैशाची उधळण, श्रीमंतीचा देखावा या सर्व गोष्टी पहावयास मिळाल्या.

पैशाने श्रीमंत असणारी माणसे आपली श्रीमंती कशी प्रदर्शित करतात. त्याचे उत्तम चित्रीकरण माझ्या नजरे समोर आहे.

आपली श्रीमंती, करोडो किंमतीची घरे, गाड्या, वस्त्रे, हिरे, माणके, सोने या स्वरुपातून समाजापुढे आणत होती. त्याचे मनांत त्या श्रीमंतीचा गर्वही होता.

त्यांचे या श्रीमंतीतून ज्या गरीबांवर अनेक वर्षे अन्याय झाला त्यांचे दु:ख काय आहे. हे मात्र प्रदर्शित होत नव्हते.

तेथे माझ्या समोर प्रश्‍न उभा राहिला श्रीमंत कोण? श्रीमंती कोणती अशा प्रकारे आयुष्याचे एक कोडे माझ्या समोर आले.

याचा विचार मनांत घोळत असताना दुसरे दिवशी दुसरी चित्रफित समोर आली ती होती जगप्रसिद्ध इन्फोसिस कंपनीच्या सुधा मुर्ती यांची. त्यामध्ये हे व्यक्तीमत्व असे होते की, जी व्यक्ती करोडोची मालकीण आहे, पण तीने ती संपत्ती तिने गरजुसाठी वळविली.

त्या व्यक्तीने गेल्या कित्तेक वर्षात स्वत:साठी एखादी नविन वस्तु खरेदी केली नाही. रहाण्यासाठी एखादा चांगला बंगला घेतला नाही. त्यांनी स्वत: अगदी साध्या घरांत वास्तव्य केले. प्रवास ही नेहमी रेल्वेच्या जनरल डब्यातून केला. त्यांनी श्रीमंती दाखविण्याचा मोह कधी केला नाही.

त्यावेळी मला प्रश्‍न पडला आयुष्य हे जगण्याचे कोडे आहे ते कोडे सोडविणारा विवेकी असावा.

त्याने का, क्रोध, मद, मोह, माया या विकारावर ताबा मिळवावा व जीवनाचे काडे सहज सोडवावे. त्याला आयुष्याचे कोडे कधीच जाणवणार नाही.

प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते. त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी यापण वेगवेगळ्या असतात.

त्यांचा जो विवेकाने विचार करतो, चिंतन करतो तो आयुष्याचे कोडे सहज सोडवू शकतो.

त्याचे जवळ ही कला असते. जो ज्ञानी असतो, जो अनुभवी असतो, तो योग्य मार्गाने हे कोडे सोडवितो.

तेव्हा पेपरमध्ये येणारे कोडे सोडविण्यापेक्षा आयुष्याचे कोडे महत्वाचे आहे. ते सोडविण्याचा प्रयत्न साधकाने करावा.

Leave a comment