याची देहि याची डोळा पाहिन मी मरणाचा सोहळा

जीवनात अनेक सोहळे आपण अनुभवतो. सोहळा याचा अर्थ कार्यक्रम, नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येऊन जो कार्यक्रम होतो, त्याला सोहळा म्हणतात.

जसे नामकरण सोहळा, मुंज सोहळा, लग्न सोहळा, पदवी दान सोहळा, सुवर्ण मोहोत्सव सोहळा, हिरक मोहोत्सव सोहळा, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा अशा प्रकारे आनंदाची पर्वणी असणारे अनेक सोहळे आपण अनुभवतो.

असे कुठलेही कार्यक्रम आपण आपल्या हयातीत आपल्या डोळ्यांनी पहाण्यात जी मजा आहे, ती इतर कशात नाही. त्याचे वर्णन कितीही केले तरी ते समाधान देत नाही.

अशाच एका सोहळ्याचे चित्रीकरण मला करावयाचे आहे. तो सोहळा म्हणजे मरणाचा सोहळा.

इतर सोहळ्याप्रमाणे या ठिकाणी पण कुटूंबिय-नातेवाईक, मित्र आलेले असतात. त्यांच्या मनात असलेली प्रेमाची भावना ते सर्वजण त्या सोहळ्यात मांडत असतात.

त्यातील ‘मी’ मात्र देहातीत होऊन गेलेला असतो.

ते काय बोलत आहेत, माझ्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत हे मात्र मला कळत नसते.

माझ्या हातून झालेल्या चूकांना त्यांनी माफ केले की नाही याची मला चाहूलही लागत नाही.

तेथे ‘मी’ अपूर्ण असतो. मनाला चुटपूट लागली असते व वाटत असते की हाच सोहळा ‘मी’ देहरूपी असताना झाला असता तर बरे झाले असते.

म्हणून परमेश्‍वराला मी प्रार्थना करतो की हा दु:खद सोहळा, मेळावा माझ्या डोळ्याने पहाण्याचे भाग्य मला दे.

मी मरणाला भीत नाही. पण जन्मभर केलेल्या कर्माला भीत आहे.

तेव्हा सर्वांची क्षमा याचना माझे कडून व्हावी व सर्वांनी मला मोठ्या मनाने क्षमा करावी.

हे माला माझ्या नजरेने पहावयास मिळावे, हीच प्रार्थना.

दु:खाचे सोहळ्यात पण नैतिकतेची जाण दिसून येते. थोर साधू संत मला उदंड आयुष्ट दे असे कधी म्हणत नसतात. ते म्हणतात, ‘याच देही याच डोळा पाहुदे मला मरणाचा सोहळा.!’

1 Comment

  • Marvin
    Posted May 23, 2026 9:35 am 0Likes

    Youre so right. Im there with you. Your blog is surely worth a read if anyone comes throughout it.
    Im lucky I did because now Ive received a whole new view of
    this. I didnt realise that this issue was so important and so universal.
    You unquestionably put it in perspective for me.

Leave a comment