प्रभू ह्रदय में.. आनंद जीवन में.. सिद्धी चरण में

ज्याच्या पायाशी सर्व सिद्धी सेवा करीत असतात, त्याचे ह्रदय प्रेमाने भरलेले असते.

त्यामुळे त्याचे जीवन आनंदमय झालेले असते.

आनंदमय जीवन जगण्यासाठी परमेश्‍वराला आपलेसे करा. त्याला ह्रदयांत स्थान द्या. त्याचे सतत नामस्मरण करा. तो तुमचे जीवन आनंदी करुन टाकेल.

प्रपंचात हा भाव फार क्वचित दिसतो. माणूस वागताना आत एक, बाहेर एक अशा द्वैत भावात वागत असतो. त्यामुळे त्याला शांती, समाधान मिळत नाही.

तेव्हा मनांत एकात्मभाव उत्पन्न होण्यासाठी एकच एक जो परमेश्‍वर आहे त्याचे शिवाय कुणालाही ह्रदयांत स्थान देवू नये.

ज्याने अखंड नामसाधना केली, त्याचे मुखात परमेश्‍वराचे नाम स्थिर होते. तेथून त्याचे मोल कळल्यामुळे ते नाम ह्रदयाच्या तिजोरीमध्ये ठेवले जाते व असा खजिना आपल्या जवळ आहे. या भावनेने साधक जीवनांत आनंदी आनंद उपभोगतो.

एखाद्या डॉक्टरला आपल्या घरी बोलवायचे म्हटले की त्याची व्हिजीट फी आपणाला द्यावी लागते. मग सर्वज्ञ परमेश्‍वर आपल्या ह्रदयरुपी घरांत बोलवायचा असेल तर त्याचे मानधन आपण दिले पाहिजे.

तो परमेश्‍वर फार दयाळू, उदार आहे. तो तोंडाने आपला मोबदला कधीही सांगणार नाही. पण कृतज्ञता पूर्वक आपण त्याचे मोल चुकविले पाहिजे.

त्याचे मोल तो स्वप्नात येवून सांगून जातो. प्रभुरायाला फक्त प्रेमाची तहान आहे. तेवढी तहान तू भागव परमेश्‍वर तुझ्या ह्रदयात येईल.

एवढा प्रचंड पसारा असलेल्या दुकानदारीत त्याने एक ही वस्तु मोल घेऊन दिली नाही. त्यांचे मोल आपण चुकवायला नको का?

जर जीवन आनंदी करावयाचे असेल, परमेश्‍वराला ह्रदयात स्थिर करावयाचे असेल तर त्याचे नामस्मरण रुपी मोल आपण त्याला अर्पण करावे.

तो प्रेमाचा भुकेला आहे. सर्वांवर प्रेम करा, स्वत:वर प्रेम करा.. जीवन आनंदी करा.!

1 Comment

  • VIVEK KESKAR
    Posted June 2, 2023 2:10 pm 0Likes

    सर..हृदयापासून धन्यवाद ! श्री
    जन्म मरण सारे..प्रारब्धाच्या आधिन …तुम्ही आम्ही लीन…त्याच्यापुढे….. अंतरी ठेवावी… ईश्वरावर दृढ श्रद्धा…विवेकाला योद्धा…करुनिया …. चित्ती असो द्यावा…शांत शुद्ध भाव…विकाराचा अभाव क्षणोक्षणी…. श्वासाशी जोडावे…गोड नाम त्याचे…प्रपंचाची चिंता…जळो लागे….सहज होत असे…आतला प्रवास….त्याचच तो ध्यास…सहवासे ….
    अंतर्बह्य आता…. मुक्त मी झालो….अव्यक्त जाणले…
    त्याच्या कृपे….
    तुझ्या ठायी माझी…वृत्ती ही निमाली …पेशी पेशी आत …
    तृप्त झाली … विवेक

Leave a comment