बापूजीं बद्दल थोडेसे
बापूजी म्हणजेच डॉ. प्रकाश भंडारी, एक असे व्यक्तिमत्त्व ज्यांनी वैद्यकशास्त्र आणि आध्यात्म यांचा समतोल ठेवून आपले जिवन रुग्णसेवेत आणि समाजकार्यात वाहून दिले.
त्यांच्या प्रतिभेवर त्यांचे काका शांतीलाल भंडारी, जैन मुनी भद्रगुप्त महाराज, ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या विचारांचा / शिकवणीचा खूपच पगडा आहे.
त्यांची वैद्यकीय कारकीर्द ही कोरेगाव येथील वैद्यकिय क्षेत्राला दिशादर्शक ठरली आहे. त्यांनी घालून दिलेल्या पायंड्या मुळे कोरेगाव येथील सर्व डॉक्टर्स आज देखील एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून ते एकजुटीने रुग्णसेवेसाठी तत्परतेने कार्यरत असतात.
रुग्णांची सेवा करत असतानाच, कर्ता-करवीता इ तर कोणी असून आपण फक्त एक निमित्त आहोत अथवा साधन आहोत याची त्यांना खात्री पटली आणि त्यांचे मन अध्यात्मात कधी रमून गेले हे त्यांना कळलेच नाही.
जगातील सर्व सुखे अनुभवल्यानंतर त्यांना कळले की खरे सुख तर दुसर्या कशात आहे, आणि ते परमेश्वराशी एकरूप झाल्या शिवाय अनुभवता येत नाही.
सर्व जग कोरोना सारख्या माहामारी बरोबर दोन हात करत होते, तेंव्हा त्यांच्या या चिंतनातून अनेक लोकाना आधार मिळाला आणि त्यांच्या मधला आत्मविश्वास जागा करण्यास मदत झाली.
त्यांनी सांगितलेली सुखी जीवनाची त्रिसूत्री, सुविचार - सुसंस्कार - सुविचार ही आपल्या समाजावर पिढ्यानपिढ्या परिणाम करणारी आहे. या त्रिसूत्रीचा वापर केल्यास आपले जिवन समृद्ध होण्यास नक्कीच मदत होईल.