शाश्वत-अशाश्वत

शाश्वत अशाश्वत हा द्वैत वाद अनंत काळापासून चालत आला आहे. खरे-खोटे, टिकावू – तकलूक असे प्रकार आपण नेहमी पहात आलो आहोत, त्यातलाच हा प्रकार आहे.

शरीर हे आज आहे. उद्या त्याचे काय होईल हे कोण जाणे.

तसेच शरीराबरोबर आलेली सर्व सुखे आज आहेत तर उद्या नाहीत.

या पृथ्वीतलावर पंचमहाभूतातून उत्पन्न झालेल्या सर्व वस्तु अशाश्वत आहेत.

त्या वस्तु निर्माण होतात. या उपभोग्य वस्तु-शरीरे आपणास कायम स्वरुपाचे समाधान देतील असे नाही.

येथे शाश्वत अशाश्वत भाव समोर येतो. अशावेळी माणसाने नक्की कुणाच्या मागे जायचे असा प्रश्न पडतो.

जन्मापासून मनुष्य हा अशाश्वत वस्तुंच्या संपकामध्ये सतत रहात असतो. त्या वस्तुची त्याची आसक्ती कमालीची जडते त्या वस्तुची अशाश्वता लक्षांत येऊन ही तो माणूस तेथून दूर जाण्याचे मागत नाही.

हेच कारण त्याला या जन्मात कधीही शाश्वत सुख प्राप्त होत नाही.

ज्या विवेकी माणसाने हे गुपीत ओळखले त्यानी या शरीराचे अशाश्वत वस्तुच्या सुखाचे पाश दूर केले. स्वत:चा विवेक जागृत करुन योग्य वेळ येताच त्या सुखाचा त्याग केला.

प्रचंड संपत्ती सौख्य वैभव असताना त्याने त्याचा त्याग करुन आपली वृत्ती अंतर आल्याकडे वळविली. तेथे कोणत्याही बाह्य आकर्षणाला प्रवेश ठेवला नाही.

दृढ निश्चय खंबीरपणा याचा अवलंब करुन अनित्याकडून नित्याकडे वाट चाल केली. मोठ मोठी अश्वासने मोठा फायदा नजरेस आला तरी ज्याने त्यातील अशाश्वत पणा लक्षात घेवून तो माणूस जागा होतो.

अनित्याची त्याला कल्पना येते तेथे तो नित्याची वाट शोधू लागतो.

आज मानव असंख्य जाती-पातीत गुंतला आहे. अनेक जाती जमातीने गोंधळ घातला आहे. त्या माणसाला अनित्याची संगत बरी वाटते.

मानवता धर्म त्याला दिसत नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी तो जातीला पुढे करतो. माणूस द्वदांत अडकतो. या ठिकाणी माणसाने विवेकाने विचार करावयाचा असतो.

या चिंतनात अशाश्वत जीवनाची त्याला कल्पना येते व त्याच चिंतनात त्याची नित्याकडे वाटचाल चालू होते.

अशाश्वताच्या गोंगारातून शाश्वतच्या गुहेकडे त्याचा प्रवास सुरु होतो. ज्याचा हा प्रवास यशस्वी होतो तो खरा सुखी समाधानी होतो.

येथे निवाडा महत्त्वाचा असतो. निवाडा हा विवेकावर अवलंबून असतो. चिंतनाने विवेकी मनाने, दृढ विश्वासाने केलेला निवाडा शाश्वत सुख समाधान देवू शकतो.

ही शाश्वताची वाट नामस्मरणाने, ईश्वराचे अनुसंधान ठेवून सतत करीत राहिले पाहिजे.

नित्य म्हणजे शाश्वत परमेश्वर व अनित्य अशाश्वत म्हणजे प्रपंच.

प्रपंचाच्या मोह जाळातून सुटून परमेश्वर चरणी लीन होणे म्हणजेच (अनित्यातून) अशाश्वतातून शाश्वताकडे जाणे होय. यालाच अद्वैत वाद म्हणतात.

मला ईश्वरा शिवाय या सृष्टीत दुसरे दैवत दिसत नाही. याचा अर्थ ईश्वर (परमेश्वर) शाश्वत आहे.

आपण जीवनात शाश्वताचे मागे जावू. अशाश्वताचा मोह टाळू शाश्वत परमेश्वराच्या पायी लीन होवू.

Leave a comment