वडिला विरुद्ध मुलीचा अनोखा खटला

वडिला विरुद्ध मुलीचा अनोखा खटला !!

आपल्या सेवानिवृत्त वडिलांच्या विरुद्ध तक्रार करता यावी म्हणून सासरी सुखाने नांदत असलेली एक मुलगी न्यायालयात गेली.
न्यायाधीशांनी विचारले ताई तुमची काय तक्रार आहे.?
मुलगी म्हणते, मला माझ्या वडिलांकडून त्यांच्या प्रापर्टी मधील माझा हक्क हवा आहे! यासाठी मला वडिलांच्या विरुद्ध खटला दाखल करायचा आहे.
न्यायाधीश म्हणाले ठिक आहे. हा तर तुमचा अधिकार आहे. मुला बरोबर मुलीला पण अर्धा हिस्सा मिळवण्याचा यामध्ये सुनावणीची काही गरज नाही. तुम्हाला तुमच्या वडीलांनी सर्व भावंडांबरोबर जो हिस्सा येईल तो देणे त्यांचं कर्तव्यच आहे.यात शंका नाही.

मुलगी म्हणते की मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही. पण तरीही मला वडिलांकडून माझा दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे.
न्यायाधीश आश्चर्यचकित झाले,ते त्या मुलीला म्हणाले “जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पैशांची काय गरज आहे?”
यावर त्या मुलीने आपल्या वडिलांचे नाव आणि पत्ता सांगितला. आणि न्यायाधीशांना विनंती केली की माझ्या वडिलांना कोर्टात बोलावलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल!
न्यायाधीश त्या मुलीच्या विनंती वरून तिच्या आई-वडिलांना कोर्टात बोलावून घेतात आणि सांगतात की, तुमच्या मुलीला दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे,मग तो कितीही असो, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल.
न्यायाधीशांचं बोलणे ऐकून वडील गोंधळून जातात आणि म्हणतात माझी मुलगी तर खूप श्रीमंत आहे सदन आहे तिच्याकडे पैशांची कमतरता नाही मग तिला माझ्या पैशांची काय गरज आहे ?
न्यायाधीश म्हणतात ही तुमच्या मुलीची मागणी आहे आणि तिचा हक्क पण आहे.
मग मुलगी म्हणते, न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या वडिलांना सांगा की, त्यांनी मला दरमहा फक्त १० रुपये द्यावेत. परंतु अट अशी आहे की त्यांनी स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावेत आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये.
न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. मग न्यायाधीश त्या वडिलांना सांगतात की, तुम्ही दर महिन्याला १० रुपये तुमच्या मुलीला विलंब न करता स्वत:च्या हाताने आणून देत जावे. आणि हा कोर्टाचा आदेश आहे, त्याचे तुम्ही पालन कराल ही अपेक्षा !
खटला संपल्यावर न्यायाधीश त्या मुलीला आपल्याकडे बोलवतात.म्हणतात तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही इतके श्रीमंत असताना तुमच्या वडीलांवर हा खटला का दाखल केला आणि वडिलांकडुन प्रापर्टीचा हिस्सा म्हणुन फारच तुटपुंजी किंमत का मागितली ? असे का ??
आता मात्र त्या मुलीचे डोळे पाणावले.आणि रडक्या स्वरात म्हणते न्यायाधीश साहेब,मला माझ्या वडिलांचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती, ते त्यांच्या कामात इतके व्यस्त आहेत की, मला त्यांना भेटून बरेच दिवस झाले आणि समोर बसून तर सोडाच पण मोबाईलवर ही कधी आम्ही बोललो मला खरच् काही आठवत नाही. यामुळे तरी माझे वडील किमान एक महिन्याला तरी तुम्ही सांगितलेली रक्कम घेऊन मला भेटायला येतील आणि मी त्यांना मनसोक्त पाहील,गळ्यात मिठी मारेल,माझं बालपण मी नव्याने जगेल
माझी मुलं आजोबा आजोबा म्हणून बिलगतील या गोष्टीसाठीच मला हिस्सा पाहिजे आहे दुसरे काही नाही.
माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे.म्हणूनच मी त्याच्यावर हा खटला दाखल केला, जेणेकरुन दर महिन्याला ते माझ्यासमोर येतील, त्यांना पाहून माझ्या मनाला आनंद होईल.
मुलीचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले.

हा सर्व प्रकार वडील लांबून ऐकत होते आता मात्र त्यांच्याही डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटतो. ते धावत येतात आणि मुलीला मिठी मारतात.बस्स ! अजून काय हवं असतं मुलीला आईवडीलांकडून…….
मित्रांनो हजारो माणसं भेटतील आयुष्याच्या प्रवासात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारी मुलगी पुन्हा मिळणार नाही… हो ना !!!

1 Comment

  • Kiran yeolekar
    Posted February 27, 2023 8:59 pm 0Likes

    अप्रतिम व ह्रदयस्पर्शी !!!

Leave a comment