आठवणीचा सुगंध

यालाच स्मृतीगंध पण म्हणतात.

एका दुकानात पुजेचे सामान घेण्यासाठी मी गेलो. तेथे सुगंधी अत्तर, सुगंधी, आगरबत्ती, सुगंधी केशर मला दिसले. त्या सुगंधाचा अस्वाद घेत असताना मला त्या वस्तु भावल्या.

मला वाटले मला आवडणार्‍या या सुगंधी वस्तु माझ्या भगवंताला आवडतील म्हणून मी आनंदाने त्या खरेदी करुन घरी आलो.

तेवढ्यात समोरुन एक गाडी आली. मला थोडा वेळ कांही कळेना.

थोडे थांबून माझ्या लक्षात आले की त्या गाडीतून माझी बालपणाची मित्र मंडळी मलाच भेटण्यासंक्ष आली आहेत.

तेथे माझ्या बालपणीच्या मैत्रिचा सुगंध दरवळू लागला. त्या सुगंधात मी धुंद झालो.

माझ्या डोळ्यासमोर बालपणीच्या आठवणी तरंगु लागल्या. त्या आठवणी अजुन अजुन जाणवाव्यात अशी इच्छा होत होती. पण कोण जाणे तो अस्वाद आता महाग झाल्याचे जाणवत होते.

पहिली आठवण झाली ती खेळण्या-खिदळण्याची. उन्हा पावसात, मातीत, दगडात घराचे अंगणात, गावांत गावाबाहेरच्या मैदानात खेळण्याची. त्यानंतर हिरव्यागार हरीत तृणांची, ती हिरवळ सर्वत्र आनंदी आनंद देत होती. आता ते खेळ ती हिरवळ, ते अनैसर्गिक लॉन फार महाग झाले. त्यांची फक्त आठवण राहिली, उपभोग फार महाग झाले.

2. दुसरी आठवण आईची झाली. पूर्वी आई खूखूप स्वस्त होती. फुल टाइम असायची. सकाळी झोपेतून उठविण्यापासून रात्री कुशीत झोपे पर्यंत सर्व ठिकाणी आईच आई होती, तेव्हा ती फार स्वस्त होती. आता ती मम्मी फार महाग झाली. जॉबला जावू लागली, फक्त सुट्टीच्या दिवशीच उपलब्ध हावू लागली. ती महाग झाल्याचे दु:ख वाटू लागले.

3. तिसरी आठवण : तिसरा मैत्रीचा सुगंध आता दुर्मीळ झाला.

4. एका ऑरेंजच्या गोळीचे दोन तुकडे करुन वाटून घेणार्‍या मित्रांची आठवण झाली. पण गोळी मात्र महाग झाली. अशा प्रकारे समोर आलेल्या मित्रांमुळे लहानपणीच्या आठवणीच्या सुगंध दरवळू लागला, पण प्रपंचाच्या भरधाव गाडीच्या वेगात तो कुठल्याकुठे विरुन गेला कळले नाही.

प्रपंच करीत असताना रोज नित्यनियमाने देवदर्शन, सायंकाळी संध्यापाठ व्हायचे, तो सहज होणारा नित्यपाठ दगदगीच्या जीवनात पूर्णपणे विसरुन गेला आहे. तो आता फार महाग झाला आहे. त्याच्या आठवणी सहज येत आहेत पण प्रत्यक्ष कर्म महाग झाले आहे.

तेव्हा आयुष्य जगत असताना नुसते जगण्यापेक्षा या सुगंधी आठवणीकडून कांही चेतना घेवून जीवन आनंदी करावे.

परमेश्‍वराचे आठवणीचा सुगंध रात्रंदिवस आपल्या ह्रदयात दरवळत राहो व जीवन आनंदी होवो, ही प्रार्थना.

हाच आठवणीचा सुगंध सर्वत्र पसरो.

Leave a comment