शाकाहार हाच जीवनानंद

आहार हा माणसाचे जीवनात महत्वाचा भाग समजला जातो.
आहाराचे दोन प्रकार आहेत.

1. शाकाहार,

2. मांसाहार .

आहार आपण घेतो तो कशासाठी? आपल्याला ऊर्जा व आनंद मिळावा, सर्वांना आनंद मिळावा, सर्व प्राणीमात्र त्या आहारामुळे आनंदी, समाधानी होवो अशी त्यामागची कल्पना असते. आहारातून मिळालेल्या ऊर्जेचा वापर आपण आपले दैनंदिन जीवनक्रम व्यतीत करण्यासाठी वापरतो.

आता वर पाहिलेल्या दोन्ही आहारामुळे माणूस तृप्त समाधानी, आनंदी होवू शकतो. परंतु कोणत्या प्रकारच्या आहारातून मुख्यत्वेकरून सकारात्मक ऊर्जा मिळू शकेल याचे चिंतन आपण करू.

पृथ्वीतला वरील अनेक प्राणिमात्र त्यांच्या जिवनक्रमा साठी, आहारासाठी ईतर प्राण्यांवर अवलंबून आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या मेंदूचा विकास पूर्णपणे झाला नाही.

मनुष्य प्राण्याच्या मेंदूचा विकास इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त झाला आहे आणि निसर्गाने मनुष्याला इतरांच्या प्रति संवेदना ही एक देणगी दिली आहे.

दुसर्‍यांच्या दुःखात आनंदी संवेदना होऊ शकत नाही.

मांसाहार हा मुख्यत्वे करुन प्राणीमात्रांची हत्या करुन केला जातो. तेथे भक्षण करणारा आनंदी होतो, पण भक्ष – मूक प्राणी दु:खी होतो. तेथे सृष्टीचा समतोल ढासळला जातो. तेथे मांसाहार जीवनानंद देवू शकत नाही कारण या प्रक्रियेमध्ये कोणाच्या तरी जीवनासाठी कोणाचे तरी जीवन हिरावून घेतले जाते.

तेव्हा स्वत:ला व इतर प्राणीमात्रांना संरक्षण देणारा आहार म्हणजे शाकाहार होय. प्राणीमात्राचा संहार करुन केलेला आहार म्हणजे मांसाहार होय.

त्या प्राणीमात्रांचा जगण्याचा हक्क आपण हिरावून घेतो व स्वत:चे उदर भरण करतो. यातून जीवनानंद मिळणार नाही.

असा मांसाहार पोटात जात असताना त्या प्राण्यांचे आक्रंदन त्या व्यक्तीच्या मनावर परीणाम करते. त्याचे मन बेचैन होईल, त्याला स्वास्थ्य लाभू शकणार नाही. त्याची जीभेच्या समाधानासाठी माणूस मांसाहाराचे गर्तेत सापडेल पण त्याचे मन त्याला समाधान देऊ शकणार नाही.

सर्व प्राणीमात्रांत परमेश्‍वराचा अंश पसरलेला आहे. तेथे प्रत्येक प्राणीमात्रासाठी योग्य चारा परमेश्‍वराने उपलब्ध करुन ठेवला आहे.

जन्माच्या आगोदर बालकाचे पोषण करणारे दूध आईच्या स्तनामध्ये साठवले असते. याकडे आपण दूर्लक्ष करु नये. तेव्हा आपल्या आहाराचे मर्यादेत राहून आपण जीवनात आनंद समाधान मिळविण्यासाठी शाकाहारच पसंत करावा.

शाकाहार हा गवत, पाने, फुले, फळे, पाणी यासून मिळतो.

त्यातील पाने, फुले, फळे हे प्राणीमात्र घेतात. धान्य, भाज्या, फळे ही माणसासाठी ठेवली जातात.

त्यातून मनुष्य प्राण्याला पचेल असे शरीर पोसले जाते. तो आहार मनुष्य प्राण्याला सात्म्य होतो. सुखकारक होतो. आनंददायी होतो.

वनस्पतीं मध्ये पण जीवन आहेच परंतु वनस्पतींमध्ये संवेदनांची जाणीव आपणास दिसत नाही. जैन धर्माने सांगितले आहे की वनस्पतींचे भक्षण तेंव्हाच करावे जेंव्हा त्यांच्यातील सजीव पणा गेला असेल. म्हणजेच त्यांनी त्याग केलेल्या पानांचा, फळांचा, फुलांच्या वापर आपण आहारात करावा.

जैन तत्वज्ञानामध्ये सांगितले आहे की, जर तुम्हाला फलाहार, योग्य आहार मिळाला नाहीतर उपवास करा, पाण्यावर जगा, पण प्राणीमात्रांची हत्या करु नका. अशा शाकाहारामुळे तुमचे जीवन आनंदी, समाधानी, समृद्ध होईल.

जीओ और जीने दो..! शाकाहार श्रेष्ठ आहार..!

1 Comment

  • सौ. शीला केतकर
    Posted November 6, 2022 2:28 pm 0Likes

    डॉक्टर साहेब
    आपला शाकाहार हाच जीवन आनंद हा चिंतन विषयक लेख वाचला.
    शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार आहे हे आपण डॉक्टर म्हणून पटवून देताच पण परदेशामध्ये सुद्धा भारतातील शाकाहाराला मान्यता मिळालेली आहे आणि लोक तो पसंत पण करतात.
    दुसऱ्याला मारून आपण आनंद घेणे हे मांसाहारात घडते. व आणि मांसाहार करणाऱ्याची मानसिकता सुद्धा बदलते.
    गीतेचा 17 व्या अध्याय मध्ये सात्विक राजस आणि तामस आहार कोणता हे भगवंतांनी सांगितले आहे. तामस आहारामध्ये मांसाहाराचा लेख केला आहे.
    आपण म्हणता त्याप्रमाणे शाकाहारामधूनच जीवनाला आनंद मिळतो.

    🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment