वेळ

आयुष्यात वेळेचे महत्व जन्मापासून सुरु होते. एखाद्याचा जन्म किती वाजून किती मिनीटांनी झाला याची बारकाईने नोंद ठेवली जाते. कारण त्याचे भविष्य त्यावेळी असणार्‍या ग्रहावर अवलंबून असते.

माणसाला वेळेचे भान नेहमी ठेवावे लागताना प्रपंचात घरातून बाहेर पडताना वेळेवर बाहेर पडावे लागते – लोकल चुकू नये म्हणून. पण पुढे एकावे लागते – वेळेवर जेवायला या.

दवाखान्यात शिरताना ऐकू येते – डॉ. वेळेवर आले. सिझर झाले की म्हणतात – वेळ आली होती. बिचारी मोकळी झाली.

कोणतीही गोष्ट करीत असताना आलेली वेळ-संधी दवडू नये कारण ती पुन्हा येत नाही. ‘नियमितपणा’ हा वेळेचा गुणधर्म माणसाने घेतला पाहिजे.

वेळेत उठणे दिनचर्या वेळेत करणे या गाष्टीतून माणसाचे व्यक्तीमत्व तयार होते.

साध्या घड्याळाचा काटा पण एकदा पुढे सरकला की मागे वळत नाही. तसे वेळ निघून गेल्यावर ती पुन्हा येत नाही.

आयुष्यात कांही गोष्टी वेळेतच वेळेनुसार होतात. तेथे घाई गडबड चालत नाही.

जन्माला आलेल्या बालकाची वाट पण वेळेनुसार होत असते. ती वाट थांबली तर ते बालक संपते.

गावाला जायचे असेल तर गाडीचे टाइम टेबल तुमच्या वेळेप्रमाणे चालत नाही. तुम्ही तिच्या वेळेप्रमाणे चालावे लागते.

प्रपंचात अचानक पाहुणे आले तर गृहिणी सर्वांचे जेवण झाल्यावर नंतर भोजन घेते कारण आलेली वेळ तिला सावरायची असते.

निसर्ग सुद्धा वेळेचे भान ठेवतो. कडक उन्हाळ्यात मधुर आंब्याची देणगी देतो. उन्हाळा वाढला की दाह कमी करण्सासाठी तो वेळेत पाऊस पाडतो.

मग माणसाने पण कधी वेळ चुकवू देवू नये. वेळ हे यशस्वी जीवनांचे सूत्र आहे त्या सूत्राला धरुन आपण आपला जीवन प्रवास आनंदी समाधानी करावयाचा आहे.

Leave a comment