नवरा बायकोचे नाते हे करंजी सारखं असतं. गोड आणि खुसखुशीत.
नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण, संसारात कितीही अडचणी आल्या कांही वाद झाले तरी ते बाहेरच्या आवरणाने सोसायचे (झेलायचे).
मनस्तापाचे काटेरी चाक स्वत:च्या अंगावर फिरवून घ्यायचे. तापत्या तुपात स्वत:ला पोळून घ्यायचे.
मात्र कुठेही आतल्या सारणाला धक्का लागु द्यायचा नाही.
सारण अबाधीत राहिल पाहिजे, तरच गोड करंजी खायला मिळेल. असं हे नवरा बायकोचं नातं एवढ्या ताकदीनं उभं असतं म्हणून करंजी गोड लागते.
तिच्या गोडवा अबाधित राखू.