झाकली मूठ सव्वा लाखाची

प्रपंचात ही म्हण नेहमी वापरली जाते.

मी बरेच वेळा झाकली मूठ सव्वा लाखाची ही म्हण ऐकली व त्याचवेळी माझ्या हाताची मुठ झाकली व उघडली. मला तेथे एक पैसा पण दिसला नाही. सव्वालाख कोठून दिसणार.

मी हताश झालो मला प्रश्न पडला या झाकल्या मुठीचाही एक जादुगर नाहीना?

तेव्हा मी आजीला विचारले – आजीने मला माझ्या लहानपणीचा किस्सा सांगितला.

आम्ही मित्र मित्र एकदा पुसेगावचे जगेत गेलो. तेथे सर्व प्रकारचे प्रदर्शन मांडले होते. कपड्याचे, खेळण्याचे खाण्याच्या पदार्थांचे ते पाहून उघड्यावर मांडलेली जिलेबी-भेळ खायाचा आम्हा मित्रांना मोह झाला. आम्ही मोहाला बळी पडून भेळ-जिलेबी यावर ताव मारला आनंद लुटला.

रात्री घरी आल्यावर एकाएकी पोट दुखीच्या संवेदना होवू लागल्या. कुणाला उलट्या कुणाला जुलाब सुरु झाले.

आम्हाला दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांनी तपासून उपचार सुरु केले. आमच्या डॉक्टरांचे मते ही विषान्न बाधा आहे त्यांनी उघडे ठेवलेले पदार्थ खाल्ले त्यातून त्यांना त्रास उदभवला आहे.

कांहीना नुसत्या औषधावर काहींना सलाईन वर तर काहींना पोट दुखी कमी होत नाही म्हणून पुढील तपास करुन शस्त्र क्रियेचा सल्ला दिला. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया पण केल्या.

हे सर्व व्याप करीत करीत हॉस्पिटल मधून सोडण्याचा दिवस आला त्यावेळी सेवकाने आमचे समोर सव्वा लाखाचे बील ठेवले. आम्ही विचारात पडलो.

तेव्हा आजी मला म्हणाली बाळा कळलेकां? झाकली मूठ कशी सव्वालाखाचा असते.

जर तुम्ही सर्वांनी घरचे बनविलेले झाकलेले पदार्थ खाल्ले असते तर ही सव्वालाखाची मूठ उघडावी लागली नसती. तेव्हा लक्षात घ्या. झाकलेले घरी बनविलेले पदार्थच खा. येथे झाकलेल्या मूठीची किंमत आजीने आम्हास समजावली.

प्रपंचात पण परमेश्वराने गुपचूप दिलेल्या सर्व वस्तु आपणाला झाकल्या मुठी सारख्या आहेत. त्या देताना कुठे बोबाटा केला नाही, त्याचे कुठे बिळ केले नाही.

मग कधीतरी आपण आजारी पडतो, अपघातात सापडतो. हात, पाय मोडून घेतो. हृदय शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया साठी लागणारे खर्चाचे आकडे पहातो. तेव्हा आपणाला लक्षात येते परमेश्वराने झाकल्या मुठीने दिलेली मदत निरोगी शरीर किती लाख मोलाचे आहे.

कोणत्याही गोष्टीवर झाकण घालणे ती गोष्ट गुपीत ठेवणे. जास्त उहापोह न करणे याला झाकली मूठ सव्वालाखाची म्हणतात.

या झाकल्या मुठीची कथा औरच आहे. जोपर्यंत ती गोष्ट झाकलेली असते. मुठीबंद असते तोपर्यंत त्या व्यक्तीला त्या वस्तुला किंमत असते. पण एकदा कां ती झाकली मूठ उघडली. तिचे प्रदर्शन झाले तर ती व्यक्ती ती वस्तु नजरेतून उतरते.

तेव्हा प्रपंचात काय किंवा परमार्थात काय आपण जे कर्म करतो त्याचा गाजावाजा करु नका.

काहींना तुमचा उत्कर्ष बघवत नाही त्यांची नजर तुमच्या कार्याला लागते. परमार्थात पण ऋषीमुनी महंत उघड्यावर आपली तपश्चर्या करीत नाहीत. घोर आरण्यात, एकांतात जादूने गुहीेत राहून झाकल्या मुठी प्रमाणे तप करतात.

त्याचे मोळ सव्वालाखाचे आहे असे म्हणावे लागेल.

Leave a comment