आत्मदर्शन

‘आत्मदर्शन’ म्हणजे आत्म्याचे आंत असणार्‍या माणसाच्या आत्म्याचे दर्शन होय.

रोज आपण बाहेर पडताना, दाढी करताना, केस विंचरताना, कपडे घालताना आरशात पहातो. दर्शन घेतो. हे सर्व बाह्यदर्शन होय. त्यातून आपण कसे दिसतो, समाजावर व इतरांवर कसा प्रभाव टाकू शकतो हे दाखवितो. हे सर्व बाह्यदर्शन झाले.

आता प्रश्न पडतो अंतर्मनाचा. त्याने कोठे दर्शन घ्यावयाचे?

जसा बाह्य दर्शनासाठी घरांत निरनिराळ्या ठिकाणी दर्पण बसविलेले असतात, तसे आत्मदर्शनासाठी मनाचा आरसा शरीरामध्ये बसविलेला असतो. त्या आरशात तुम्ही अंतरीक दृष्ट्या कसे आहात, तुमच्या मनांत काय चालेले आहे व तुम्ही बाहेरच्या मनात-आरशात काय दाखविता याचे चित्रण केले असते.

आयुष्यात आपला सततचा सहवास बाह्यवस्तुंशी आलेला असतो. त्यामुळे बाहेरचा आरसा धुवून, पूसून स्वच्छ केला जातो. मात्र अंतर्मनातील आरशाकडे कधी लक्ष न गेल्याने तो आतल्या आत धुळखात बसलेला असतो.

जेव्हा विवेकी माणूस अंतर्मनातील या आरशावरची धूळ चिंतनाने, मननाने दूर करतो त्यावेळी त्याची अंतर्मनातील ज्ञानाची ज्योत पेटली जाते व तेथे त्याला आत्मदर्शन होण्यास सुरवात होते.

या ज्योतीच्या प्रकाशात विवेकी माणूस राग, लोभ, मत्सर, अहंकार यांच्या धुळीला साफ करतो व मनाचा आरसा दर्शन करण्यासाठी तयार करतो.

यामध्ये मग त्याला आपण कोण आहोत? कशासाठी जन्माला आलो आहोत? याचे दर्शन होते.

सर्व प्राणीमात्रामध्ये संचारलेला आत्मा हा एकच आहे याची जाणीव होते.

त्यातून प्रेम, भक्ती, गुणगौरवता वाढते व माणूस आनंदाने जगू लागतो.

Leave a comment