बहुरुपी राम

रामाला आपण प्रपंचात आरध्य दैवत मानतो. त्याची पूजा करतो, तो पण आपणास अनेक रुपे घेवून सेवकाला मदत करतो. तो बहुरुपी आहे.

अनेक अनेक रुपे घेवून तो सेवकाला दर्शन देतो, त्याची अनेक रुपे अशी

प्रपंचात तो आराम रुपाने असतो. आपणास प्रपंचात आराम हवा असतो. तो मिळाला की आपणाला राम मिळाला असे वाटते.

पण जो खरी भक्ती करतो त्याला तो नसता आराम देतो. हे प्रपंचातील त्याचे रुप होय.

हराम – प्रपंचात एखाद्याने एखादी वस्तु घेतली व परत केली नाही तर त्याला हराम म्हणतात. परमेश्‍वर (राम) एकदा सेवकाला आपलेसे करुन त्याला परत दूर करीत नाही. म्हणून हे हराम रुप दिसते.

प्रपंचात आळशी पणाने जो एकदा झोपतो तो लवकर उठत नाही. त्याला वीराम म्हटले जाते. त्या रामाचे हे तीसरे रुप आहे.

प्रपंचाला योग्य संस्कार देण्याचे जो राम काम करतो त्याला आकाराम म्हटले जाते. ते रामाचे चौथे रुप आहे.

प्रपंचात मित्राचे रुप घेवून जो वागणूक ठेवतो, त्याला सखाराम म्हणतात, हे रामाचे पांचवे रुप आहे.

प्रपंचात एखाद्याच्या ह्रदयात काय आहे हे जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. ते रामाचे सहावे रुप होय.

एक पत्निव्रत घेऊन जो प्रपंच करतो त्याला सीताराम म्हणतात. हे त्या रामाचे सातवे रुप आहे.

परमार्थात खुद्द भगवंत ज्याचे पूजन करतात, त्याला तुकाराम म्हणतात. हे रामाचे प्रपंचातील आठवे रुप होय.

या प्रमाणे प्रपंचातील रामाची आठ रुपे ज्या साधकाला कळळी त्याला मी राम राम म्हणतो. त्यांना मी नमस्कार करतो.

अशा प्रकारे आपण पण प्रपंचात बहुरुपी होवून प्रपंच करावा.

ही वसंत पंचमीची साधकाला भेट होय.

Leave a comment