तुकोबांच्या या गाथेतून त्यांनी प्रपंच करीत करीत संतांची मने जिंकीत जिंकीत सेवेकर्याप्रमाणे विठ्ठलाची सेवा करीत प्रपंच पूर्ण केला. प्रपंच यशस्वी केला.
तेथे कुणाला दुखविले नाही. त्यात असणार्या काम, क्रोध, मोह, माया, आसक्ती या रिपुंना शांत केले. विषय, आसक्ती यांना गारद केले, जेरबंद केले व अलगत पणे संसाराचे जंजाळातून बाहेर पडलो.
येथे आम्ही संसार (प्रपंच) जिंकला. त्याठिकाणी भगवंत पुजेचे नियमित व्रत केले. त्याव्रतातून माझी निस्पृहता, निर्मोदिता पाहून त्यांनी मला आपलेसे केले व परमार्थात उच्च पदस्थ नेऊन ठेवले.
येथे नम्रता, शालिनता, सचोटी या गुणामुळे आम्ही भगवंताचे मन वळविले. षडविकारांना चिरेबंद करुन ठेवले. स्वाभिमान, अभिलाषा, अहंकार यांना चिरेबंद केले. असे करीत करीत आम्ही प्रपंच जिंकला.
प्रपंचातून मुक्तता प्राप्त केली व आम्ही जिंकला प्रपंच.