विद्या म्हणजे ज्ञान.
मनुष्य जगतो तो कोणत्यातरी विद्येचे आधारावर. त्याला नोकरी मिळते ती पण त्याच्या पदवीवर. त्याला समाजात मान सन्मान मिळतो तो पण त्याने मिळविलेल्या विद्येवर.
अशी ही विद्या मनुष्य जीवनाशी अत्यंत संघटीत आहे.
या विद्येचे पण प्रकार दोन आहे.
एक कनिष्ठ विद्या व एक श्रेष्ठ विद्या.
दुसर्यांचे दोष पहाणे ही कनिष्ठ विद्या होय आणि जी स्वत:चे गुण व दोष पहाते ती श्रेष्ठ विद्या होय.
ज्या विद्येतून स्वत:चे गुण दोष समोर येतात ती श्रेष्ठ विद्या आपण आत्मसात करावी. त्यामध्ये आत्मचिंतन केले जाते.
एका बोटाने ज्यावेळी दुसर्याचे दोष आपण दाखवितो तेव्हा चार बोटांनी स्वत:चे दोष जगतात पसरविले जातात.
एखाद्या गोष्टीचे संपूर्ण ज्ञान होण्यापूर्वी त्यावर भाष्य करणे म्हणजे विद्ये दिना वाचळता व्यर्थ आहे असे होते.
विद्येतून ज्ञानातून स्वत:ला समाधान आनंद मिळतो. गायनाची विद्या ज्याला जमली त्याने प्रपंचाचे सूर चांगले जुळवीत जीवन आनंदात केले, ज्याच्या कंठातून हे सूर बाहेर पडले नाहीत त्याचा प्रपंच विस्कळीत झाला.
तेव्हा प्रपंच सूरामध्ये आळविण्यासाठी विद्या अवश्यक आहे.
अशी विद्या विनयेन शोभते. त्या विद्या धारकांना अहंकार नसावा. नम्रता असावी तरच त्या विद्येला शोभा येते विद्या धारकाला प्रतिष्ठा प्राप्त होते. विद्या धारकाला प्रतिष्ठा प्राप्त होते.
कोणतीही विद्या प्राप्त करण्यासाठी प्रारंभी गुरु स्थानी असणार्या गणरायाचे पूजन करतो. नम्रपणे ही विद्या मला लाभ देवो अशा प्रार्थना करतो या गोष्टीपण आपण पूराणापासून पहात आलो आहोत.
तेव्हा प्रत्येकाकडे कमीत कमी एकतरी विद्या असणे गरजेचे आहे ती विद्या संपादन करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सर्व धनात विद्याधन हे फार मोलाचे आहे. ते देण्याने वाढीस लागते. त्या धनाला चोरीची भिती नसते ते धन सर्वांचे कल्याण करते. सर्वांना आनंद देते.
अशा या विद्याधनाची प्रत्येकाने पूजा करावी.