विचार करावा बोलण्या आधी

माणसाने जीवनात काय करावे याचे मार्गदर्शन करणारे विचार येथे मांडले आहेत.

जीवनात अचानक पणे इतक्या गोष्टी घडतात, की त्या पाहिल्या नंतर वाटते थोडे थांबलो असतो थोडा विचार केला असता तर बरे झाले असते.

ते विचार असे-

पाय जपावा वळण्याआधी। तोल जपावा ढळण्या आधी।

अन्न जपावे विरण्याआधी। नाती जपावी तुटण्या आधी।

शब्द जपावा बोलण्याआधी। रंग जपावा उडण्या आधी।

मन जपावे मोडण्याआधी। वार जपावा जखमे आधी।

आश्रु जपावे हसण्या आधी। श्वास जपावा पळण्या आधी।

वस्त्र जपावे मळण्या आधी। द्रव्य जपावे सांडण्या आधी।

हात जपावे मागणी आधी। भेद जपावा खुलण्या आधी।

राग जपावा भांडणा आधी। शरीर जपावे जळण्या आधी।

वेळ जपावी मरणा आधी । शब्द जपावा बोलण्या आधी ।

व्यायाम करावा व्याधी जडण्या आधी । पश्चाताप करावा कर्म करण्या आधी ।

विचार करावा बोलण्या आधी।भक्ती करावी मरणा आधी।

असा हा ईश्वराने दिलेला संदेश मनांत ठेवून प्रत्येकाने वागावे तर जीवनात अभय दान येईल व आपण सुखी होवू.

Leave a comment