उद्याचा सूर्यादय आजच्या पूर्व संधेत पहा

उद्याच्या कामाचे नियोजन आजच करा. दिनचर्या तयार करा. दिनचर्येची नोंद ठेवा. चिंतन करा.

मनाला सकारात्मक बनवा. ही जीवन जगण्याची कला आहे. ती संपन्न करा.

त्यासाठी बुद्धी चातुर्य वाढवा कोणत्याही परिस्थितीत चांगल्या विचारांचा पगडा मनावर राहिल असा प्रयत्न करा.

एकाच क्षेत्रात पुढे जाऊन यश मिळविणे असे आपले ध्येय ठेवू नका तर सर्व क्षेत्रांत सुख समाधान निर्माण करण्याचे ध्येय ठेवा.

पैसा हे सर्व सुखाचे साधन नाही. सुखासाठी भौतिक गोष्टींची साथ गरजेची आहे असे नाही. तर मानसिक शांतता, समाधान असणे गरजेचे आहे.

समाजात प्रतिष्ठा व परमार्थात परोपकार साधण्यसाठी उद्याचे हे यश पहाण्यासाठी आज पासून प्रयत्नाला लागा.

पैशाने जे काम होणार नाही, ते मानसिक शांततेने होऊ शकते. त्यामुळे तुमचे बोलणे असे ठेवा की त्यातून तुमची यशस्वी वाटचाल होईल.

प्रपंचात

धन कहता है – मुझपर विश्‍वास रख,

समय कहता है – मुझे जीत,

कॅलेंडर कहता – है मुझे पलट,

भगवान कहता है- कर्म कर और मुझपर विश्‍वास कर.

मी म्हणतो – उद्याच्या स्वप्न पुर्तिची तयारी आजच कर.

मनाला कोणत्याही कामाची सवय असावी.

संधी येताच ती कामे करावीत, कोठेही मोहात अडकू नये, सर्वात मिळून मिसळून रहावे. पण कमळाप्रमाणे निष्कलंक असावे,

प्रेमात जग जिंका. या सर्व गाष्टी आधी करा व मग त्याची वाच्यता करा. यश संपादन करणेसाठी आधी मौन ठेवा. मौन हे उद्याच्या सूर्योदयाचे ध्येय आहे.

आजच्या पूर्व संधेला ते मनांत ठेवा, सकारात्मक वृत्तीतून उद्याचा सूर्यादय पहा. उद्याच्या सूर्योदयाला आजच्या मावळत्या संधेने नमस्कार करा. जीवन यशस्वी होईल.

मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांना भेटवस्तू देवू नका. त्यांना संस्कार द्या. त्यामुळे त्यांना आयुष्यभर रडण्याची पाळी येणार नाही.

गळून गेलेल्या पाकळ्यातही गंध कालचा उरेल बाकी,

ठसे राहतील असे ह्रदयी, आठवण ठेवूनी तुमच्या मनी.

म्हणून उद्याचा सूर्योदय आजच्या पूर्व संधेत पहा.

1 Comment

  • सो. शिला केतकर
    Posted June 10, 2022 8:14 pm 0Likes

    उद्या च्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच तयारी केली पाहिजे. अगदी खरे आहे.
    उद्याचा सूर्योदय आजच्या संध्येत पहावा.
    आयुष्याच्या पूर्वार्धात जे कर्म करू त्याप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात त्याचे फळ मिळत जाते

    चांगले कृत्य केले तरच उद्याची स्वप्नपूर्ती होते अगदी विचार छान आहे👍🙏

Leave a comment