तेथे कर माझे जुळती

सहजगत्या, विनासायास एखादी गोष्ट होणे, याला जुळणं म्हणतात. त्यासाठी खटाटोप, यातायात करावी लागत नाही.

जसे गावांतून फिरत असता मंदिर दिसता क्षणी आपले हात नमस्कार करण्यासाठी जुळतात व तेथे नमस्कार केला जातो.

ही झाली नकळत होणारी क्रिया. याचा अर्थ अनेक दिवस ही भावना आपल्या मन:पटलावर उमटत गेली.

मन:पटलावर त्या मंदिराची दृढ छाया पडत गेली व आता त्या मंदीरासमोर जाताच अज्ञाचक्राने हाताला नमस्कार करण्याची आज्ञा दिली व सहजच नमस्कार केला गेला. केवढे हे गुढ आहे.

ज्याच्या पुढे हात जोड जोड म्हणून घरातील लोक अग्रह करतात तेथे मन परवानगी देत नाही, पण ज्या ठिकाणी श्रेष्टत्वाची भावना समोर येते व श्रेष्ठत्व नजरेस येते तेथे न सांगता दोन्ही ‘कर’ नमस्कार करतात.

जगामध्ये अशी पुष्कळ ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी गेल्यावर ती ठिकाणे बघीतल्यावर न कळत आपले दोन हात त्यांना नमस्कार करतात.

ताजमहालची रेखीव कलाकृती काय? अजंठा-वेरुळची लेणी काय? नायगराचा धबधबा काय? हे सर्व पाहिल्यावर न कळत दोन हात, दोन पाय व एक मस्तक असे पंचांग भावाने त्यांना नमस्कार करावा वाटतो.

न कळत त्यांचे समोर गेल्यावर हात जोडले जातात.

अशा ‘त्या’ ठिकाणी जाऊन बसण्याचा प्रयत्न माणसाने करावा यातच जीवनाची इतिश्री आहे.

Leave a comment