सूत

सूत याचा अर्थ पुत्र.

तसेच सूत म्हणजे कापसापासून बनलेला धागा – याचा धाग्याला धरुन पुढे येतो तो शब्द म्हणजे सूतक.

स्नेही संबंधी गेल्यानंतर जे दु:ख येते. जी बंधने येतात त्याला सूतक असे म्हटले जाते.

प्रपंचात एखाद्या गोष्टीशी आपला कांही संबंध नाही त्यावेळी म्हणतात – त्याच्याशी माझे काही सोयर सूतक नाही.

लहानपणी  शाळेमध्ये शिकत असताना आम्हा विद्यार्थांना एक तास सूत कतणी  करावी लागत असे. तेथे चरख्यावर बसून कापसाच्या वेळूतून उत्तम असा धागा रिळावर गुंडाळला जाई. अशी सुत गुंडाळलेल्या रिळे एकत्र करुन त्यातून सुंदर असे वस्त्र विणले जाई.

माणसाला जगण्यासाठी अन्य वस्त्र निवारा याची नितीत गरज असते. त्यातील वस्त्रांची  गरज या सूतातून भागवली जात असे.

हा धागा हे सूत स्वत: तयार करावयाचे असते यातून देश प्रेम उत्पन्न होते व स्वदेशीचे वस्त्र लोकांना दिले जाते.

त्यावेळे पासून मला खादीची आवड उत्पन्न झाली. असे खादीचे वस्त्र परीधान करुन मी समाजात वावरु लागलो. जन माणसात माझी प्रिती वाढत गेली.

मला सूताने साथ दिली ज्या घराण्यातून माझी पत्नी आली त्या घराण्याशी माझे घराण्याचे सूत जमले. त्या सूतातून पन्नास वर्षाचे कारकीर्दीत एक सुंदर तलम रेशमी वस्त्र तयार झाले.

अशा या सुंदर वस्त्राने ते वस्त्र परीधान करुन आम्ही दोघांनी पुढील वृद्धापकाळ व्यतीत  करीत आहोत. तो धाग ते सूत आम्ही कधी विसरणार नाही या धाग्याच्या आधाराने आम्ही वय झाले तरी थकत नाही.

तेथे बोरकरांचा कविता आठवते.

एक धागा सुट्ट्याचा शंभर धागे दु:खाचे. जरतारी हे वस्त्र मानवा तुझीया आयुष्याचे.

तेव्हा या सूताला धरुनच आपणाला स्वर्गाप्रत जायचे आहे.

तेव्हा सावध व्हा. सूताचा गुंता करु नका. गुंत्याची उकळ करा प्रपंचाची इतिश्री करा.

असे सूत जमवत जमवत मी त्या सुतातून विणत विणत सुंदर रेशमी वस्त्र तयार केले. ते परीधान करुन मी समाजात वावरु लागलो . इतरांशी जमवून घेण्याची कला शिकत शिकत जेथे जाईन  तेथे माझे सूत जमत गेले. जनसामान्यात माझी प्रिती वाढत गेली.

प्रपंचात पण एका वळणावर मला सूताने साथ दिली. ज्या घराण्यातून माझी पत्नी आली त्या घराण्यातील माणसांशी माझे सूत जमले त्या सुतातून पन्नास वर्षाची कारकीर्द घडली. एक रेशमी तलम वस्त्र तयार झाले. आता हे वस्त्र परीधान करुन आम्ही दोघे आनंदात वृद्धापकाळ व्यतित करत आहोत. पण अजूनही तो सूताचा धागा आम्ही सोडतच नाही.

आम्हाला साथ देणारे दोन सूत आहेत. समीर – सागर. एक वेगाने वाहणारा समीर. तर दुसरा अथांग सागर.

कराडच्या सुशिल (सुभाष-शिला) या धाग्यातून समीर स्नेहाचे सूत जमले. त्यातुन तन्मयचे वस्त्र साकारले.

पुढे सांगलीचे छाया प्रसाद हे या सूताचे धाग्यामध्ये गुंफले गेले. सागर स्फूर्तिच्या योगातून त्याच्या प्रपंचाला पालवी फुटली. समुद्र मंथनातून अर्थचा अमृत कुंभ प्रकटला.

Leave a comment