सूर्यादयापासून रात्री पर्यंत मावळती पर्यंत सूर्य निरनिराळ्या छटांचे आपणास दर्शन देत असतो.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यनारायण आपणापाशी जे जे जास्त आहे, इतरांना देण्यासारखे आहे ते तो देतच असतो.
सूर्योदयाचा उजेड रात्रीचा अंध:कार नष्ट करतो व लोकांना ज्ञानाची, उजेडाची भेट देतो.
त्याप्रमाणे माणसाला पैसा, रुप, ताकद, बुद्धी या गोष्टी मोठ्या प्रमाणात मिळणे ही भाग्याची, पुर्वपुण्याईची गोष्ट असते.
हे सर्व ज्यावेळी येते त्यावेळी नकळत माणसाला गर्व होतो.
त्याचा परीणाम तो इतरांना तुच्छ लेखू लागतो आणि अशा अहंकारी माणसांना लोक टाळू लागतात.
यासाठी सूर्याचे उदाहरण आपण समोर ठेवूया.
त्याने आपणाकडे असलेली अफाट उर्जा सृष्टीला बहाल केली अशी सृष्टीमध्ये पण उदार माणसे आहेत.
जसे रतन टाटा, बिर्ला अशी अनेक अनेक माणसे आहेत, त्यांनी आपल्या संपत्तीच्या नुसत्या छटा जगभर दाखविल्या नाहीत, तर गरजुंसाठी उपचार केंद्रे, शाळा, कॉलेज, मोठ मोठी मंदीरे उभी केली, आदर्श उभे केले.
सूर्य मध्यान्हिला तळपतो, आपली उर्जा सर्वत्र पसरतो, कष्ट करणार्या मजुरांना घाम फोडतो, पण त्यांचे जीवन आनंदी करतो, त्यांना अन्न पाणी निवारा देतो.
ही पण सूर्याची तळपती छटा आहे. सर्व काम संपवून परतीच्या मार्गावर जाताना तो आपले पंख पसरुन शांतपणे सृष्टीकडे पहात असतो.
लोकांना ईर्शा होऊ नये, द्वेष होऊ नये म्हणून तो कधी डोंगराचे आड, तर कधी झाडा झुडपांचे मागे जाऊन लपून बसतो.
ही सूर्याची मावळती छटा पण विलोभनीय वाटते.
याप्रमाणे आपणाकडे जे जास्त आहे ते इतरांना देवून त्यांची गरज भागविणे, हे सूर्याची छटा खूप कांही सांगून जाते.
आपल्या देशात असलेल्या गरीब अशिक्षीत, अडाणी लोकांची देवावर खूप श्रद्धा आहे. त्यांना परमेश्वरापुढे डोके टेकवायला जागा हवी असते. त्यातून त्यांना समाधान आनंद मिळतो, म्हणून आपल्या व्यवसायात मिळालेला अतिरिक्त पैसा समाज मंदीरे, देवालये उभारण्यात टाटा, बिर्ला यांनी खर्ची घातला.
ही पण त्याच्या संपत्तीचे-संस्कृतीचे ज्वलंत उदाहरण आहे.म्हणून भगवंताकडे डोळे भरुन पहाण्यासाठी त्यांनी मंंदीरे उभी केली.