प्रज्ञ याचा अर्थ तज्ञ – जाणकार.
जो प्रपंचात तसेच परमार्थात जाणकार होवून आपली वृत्ती स्थिर ठेवतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणावे.
असा ज्ञानी नुसता ज्ञानी असून उपयोगी नसतो. कोणत्याही प्रसंगात तो चंचल होत नाही.
जो कोणत्याही प्रसंगात स्थिर रहातो, आपला संयम कधी ढळू देत नाही, असा ज्ञानी साधक साधू संत स्थितप्रज्ञ म्हणून ओळखला जातो.
ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर झाली आहे अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. अशा माणसाला कोणतीही आशा, अभिलाषा नसते. तो सदा तृप्त असून सुख व दुःख यांमुळे त्याला आनंद किंवा उद्वेग होत नाही.
ब्रम्हचैतन्य महाराज यांनी त्यांचे संदेशात स्थितप्रज्ञाची चांगली ओळख करुन दिली.
ते म्हणतात…
‘‘राज्याधिकार येवो किंवा जावो, भंगावे न कदा समाधान’’
असा सुंदर संदेश त्यांनी साधकाला दिला आहे.
परमार्थात पण सर्व कर्म परमेश्वराला सुपुर्त करावी व त्याचे परीणामाचा विचार न करता येईल तो परीणाम त्याची इच्छा म्हणून स्विकारायचा.
एकावर अखंड निष्ठा, प्रेम, भक्ती ठेवणे याचा अर्थ ‘‘निष्काम भाक्ती’’ यालाच स्थितप्रज्ञ म्हणावे.