सौ सुनारकी एक लुहार की

ही म्हण पुष्कळ वेळा आपण ऐकतो. तिचा अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे.

जीवनात व निसर्गात घाव घालणारे दोन प्रकार आहेत. एक सोनारा प्रमाणे अलगत नाजुक घाव घालून मौल्यवान वस्तुंची किंमत वाढविणारे तर दुसरा प्रकार लोहाराचा तो मात्र कठोर होवून एका घावातच लोखंडाचे दोन भाग करतो. त्यांचा संबंध तोडतो दोन भाग अलग होतात.

प्रपंचात पण अशी माणसे असतात ती आपले नाते संबंध हळुवार, प्रेमाने जपत जपत त्याचे संस्कार कुटुंबियावर करत असतात तर कांही जण क्रोधी असतात.

आपल्या मताशी सहमत न होणार्‍यांवर प्रहार करुन नातेसंबंध तोडून टाकतात. तेथे त्या कुटुंबाची किंमत कमी होऊन जाते.

येथे लक्षात येते की माणसाच्या भावनेचा विचार करुन त्यावर हळू हळू चांगले संस्कार करावयाचे, का क्रोधाने-रागाने त्याला दुखवून दूर करावयाचे?

येथे मैत्रीचे नाते कसे असावे हे पण या म्हणीतून लक्षात येते.

जो मित्र आपल्या शंभर चुकावर पांघरुण घालतो व आपल्या मैत्री भावाने मित्राला सुधारण्याचा प्रयत्न करतो तो मित्र म्हणजे साचा मित्र होय तेथे म्हणावे वाटते.

सौ सुनारकी एक लुहारकी!

जीवनात हजारो मित्र जमविण्या पेक्षा एका सच्चा मित्राची संगत भाग्याची असते.

खेडेगावांत असणारी शेकडो एकर जमीन शहरात असणार्‍या व्यापार्‍याला कसपट वाटते.

तेव्हा संपत्ती ऐश्वर्याच्या शोधात हजारो गोष्टीचा संग्रह करण्यापेक्षा नश्वर-निराकार एक परमेश्वराची संगत करा.

कौरव पांडवांचे युद्धात पण कृष्णाच्या सहस्त्र सैन्यापेक्षा स्वत: कृष्णाचे एकट्याचे सारथ्य अर्जुनाने मागुन घेतले

तेथे पण सौ सुनारकी एक लुहारकी ही म्हण समोर येते.

म्हणून साधकाने सकाळी उठल्यावर परमेश्वराला प्रर्थना करावी.

मला जगातील अनेक सुखे देणारे हजारो मित्र देण्यापेक्षा तुझी चरण सेवा करणारा साचा एक मित्र संत संगत दे ।

माझा भाव तुझ्या एकत्वात आहे मला तू अनेकात पाहू नको.

तुझ्या चरणी माझा भाव अखंड राहो.

Leave a comment