प्रसाद

प्रसाद शब्दांची फोड करता वेगळे चित्र डोळ्यासमोर येते. प्र म्हणजे प्रयत्न, सा म्हणजे सातत्य, द म्हणजे दया. ज्या प्रयत्नामध्ये सातत्य आहे, ज्या नामस्मरणात सातत्य आहे, सर्वांबद्दल दया भाव आहे. त्या प्रयत्नातून निर्मार होणारा तो प्रसाद होय.
प्रसाद हा एक अन्नग्रहणाचा प्रकार आहे. प्रपंचात आपण ठिकठिकाणी जेवणावळी घालतो. लग्नाच्या जेवणावळी रोजचे जेवण व देवळात देवावर भक्ती ठेवून सर्वांना असा सात्विक आहार मिळू दे. या भावनेने केलेली जेवणावळ. असा जेवणावळ व प्रसाद यातील फरक आहे. लग्नाच्या जेवणावळीसाठी आमंत्रणाची गरज असते. तर देवाच्या प्रसादासाठी सर्वांनी जाण्याचा अधिकार असतो. तेथे श्रीमंत गरीब असा भेद नसतो. प्रसाद हा भक्तीने केलेला असतो, त्यासाठी लागणारे द्रव्य, सेवा ही प्रत्येकजण कुवतीप्रमाणे करीत असतो. प्रसादासाठी दिलेल्या दानाचे मोजमाप केले जात नाही. कोणत्याही जातीचा जमातीचा माणूस येऊन प्रसाद सेवन करु शकतो. प्रसादाचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रम्हचैतन्य गोंदवले येथे होणारे अन्नदान होय. तेथे अखंडपणे प्रसादाची सोय केली आहे. फक्त तेथे साधकाने आपली ओळख नामधारक म्हणून द्यायची असते. नामाचे अनुसंधान ठेवायचे असते. अनेक ठिकाणाहून अनेक माणसे महाराजांचे दर्शनासाठी येतात. बरोबर वेळेवर 12.20 वा. नाम गर्जना चालू होते. आरती होते व सर्वजण आपले नामस्मरण करुन र्‍हदय शुद्धी करुन महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी रांगेत उभे असतात. जेवणावळीत अग्रह असतो. तेथे एकापेक्षा एक स्वादिष्ट पदार्थ वाढले जातात. प्रसादामध्ये एकच पदार्थ सतत समोर येतो तो म्हणजे नामस्मरण.
जेवणावळीत पदार्थांची नासधूस होते. अन्नाची नासाडी होते. तसे प्रसादामध्ये होत नाही. तेथे अन्न हे परब्रम्ह समजून सेवन केले जाते. काही तपश्‍चर्येनंतर प्रसाद म्हणून जेवणाचे आयोजन केले असते. तेथे त्या प्रसादाला फार महत्व असते. कोणीही तो प्रसाद डावलू नये असा संकेत त्या ठिकाणी असतो.
प्रयत्नाची पराकाष्टा करुन सतत नामास्मरण करीत. जे फख म्हणून प्रसाद समोर येतो. त्याचे मोल करता येत नाही. तो प्रसाद, जेवणावळ, फख,पुष्प, खडीसाखर, गुळ, खोबरे, शिरा याद्वारे दिला जातो. परमार्थात पण घोर तपश्‍चर्येनंतर असे प्रसाद दिले जातात. काहींना त्यांच्या प्रापंचीक कष्टातून विरक्तीचा प्रसाद मिळतो. कांही जणांना भगवंताची भक्ती लाभते. कांहीजण तपश्‍चर्येच्या जोरावर परमेश्‍वर सानिध्य साधतात. तेव्हा प्रसादाला साद घाला.

Leave a comment