आयुष्याची 78 वर्षे जे मी पहात आलो, जेथे जेथे मी गेलो, ज्या ज्या मंदीरात मी गेलो, ज्या ज्या तीर्थक्षेत्रात हिंडलो तेथे एकच ध्यास मला दिसला.
देवा मला हे दे, मुलगा दे, संपत्ती दे, घर दे, गाडी दे, नोकरी दे, प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने देवाला मागणी घालतच असतो.
देव मात्र लांबून हे सर्व पहात असतो. त्या मागण्या इतक्या वाढत असतात तेथे तो देत आहे, दाता आहे, आपला पालन कर्ता आहे, हे सर्व विसरुन त्यालाच हुकूम करीत असतो.
कधी पाऊस दे, नाहीतर तुला पाण्यात बुडवून ठेवीन हा धाक पण दाखवितो.
हे सर्व पाहिल्यावर माझ्या मनांत विचार येतो, आपण परमेश्वराकडे काय मागावे, मागण्याची पण एक रीत असते, देणाराची नजर असते. आपली नजर त्याच्याशी जुळली तर सर्व कांही मिळणार असते, तेव्हा त्या दात्या परमेश्वराला काय मागावे?
त्याने न मागता इतक्या गोष्टी दिल्या आहेत, तर आपण आणखी काय मागणार?
तेव्हा ईश्वरा तू सर्वज्ञ आहेस, सर्वांचा पालन करणारा आहेस, तारणहार आहेत, तेव्हा काही मागून मी माझी जिव्हा वितळू देत नाही.
पण द्यायचे असेल तर एकच कर माझे चित्त, आज्ञाचक्र संतुलीत कर. त्यामुळे तुझा विसर मला कधी पडणार नाही. तुझी आठवण तुझी चरण सेवा सतत घडो. हीच मागणी मी परमेश्वर चरणी करेन.
थोडक्यात हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.
परमेश्वराच्या दारात येणार्या विविध अनुभूती –
एक वृद्ध अंध म्हातारी परमेश्वराचे दारात भीक मागत असते. मी दाता म्हणून तिची धडपड पाहून तिला देण्यासाठी खिशातून पाकीट बाहेर काढले व पाकीटातील नोटांकडे दूर्लक्ष तरीत चिल्लर शोधू लागलो.
त्यात पण 10 व 5 ची नाणी बाजूला करत सर्वात छोटं नाणं मी काढून तिच्या हातावर टेकविले. मला दानशूर असल्याचा भास झाला.
ती अंध म्हातारी आणखी लोकांसमोर हात पसरत होती, हातावर पडणार्या नाण्याचा स्पर्श होताच सुखी हो असा आशिर्वाद देत होती.
एका रुपयाचे बदल्यात देवाच्या दरात मिळविलेला आशीर्वादाने मी खुष झालो.
मी दर्शनासाठी पुढे सरकलो माझ्या प्रमाणे ती म्हातारीपण पुढे पुढे सरकत होती.
तिच्या चिवटपणाचा मला राग आला, मी तिला खडसावले, म्हातारी दिलेले पैसे बास नाहीत का्य? आजून काय पाहिजे?
म्हातारी म्हणाली कांही नको, मी देवाला भेटायला निघाले आहे, तेव्हा तिला चिडविण्यासाठी मी तिला म्हणालो, आता देवाकडे जावून पैसे मागणार आहेस काय?
म्हातारी म्हणाली, देवच रोज देत असतो तुमच्या सारख्यांच्या हातातून.
पुढे मी तिला विचारले आज काय तुला देवाचे दर्शन घ्यावयाचे आहे काय?
तेव्हा म्हातारी म्हणाली, बाळा, मला तर कांही दिसत नाही तेव्हा आत जावून त्याचे दर्शन कसे घेणार?
ती म्हातारी मंदीरातून बाहेर पडू लागली तेवढ्यात एकाने तिच्या हातावर पन्नासाची नोट ठेवली. म्हातारी म्हणाली, एवढा कसा रे देवा तू हिशेबी आहेस. तू तर तुला दिलेल्या पैशापेक्षा दसपट परत करतोस.
तुझ्या मनांत साधकाबद्दल करुणा आहे, तु दयावंत आहेस तेव्हा मी तुझे उपकार फेडू शकत नाही.
येथे मंदीराचे दारातच मला माझ्या दात्रृत्वाची अनुभूती आली.
मी मात्र हलक्यातील हलकी भेट देवून आपल्या दार्तृत्वाचा गर्व करतो हे खरे नाही.
आपल्याला मिळालेल्या मोबदला जरुरी पुरता ठेवा व राहिलेला ज्याने तो दिला आहे, त्याला अर्पण करा. तरच तुम्ही आनंदी राहू शकाल.
ही मंदीराचे दारात आलेली अनुभूती मी आपणाकडे सुपुर्त केली.
तेथे पुन्हा वाटते.. हेचि दान देगा देवा तुझा विसर न होवो देवा !