निःस्पृह म्हणजे कशाचीही अपेक्षा नसणे. ‘निःस्पृहता’ म्हणजे अशा मानसिक अवस्थेमध्ये माणसाने जगणे याला निःस्पृहता म्हणतात. ही गोष्टी तशी फार अवघड आहे.
प्रपंच करीत असताना रोज एखाद्या गोष्टीची आपण अपेक्षा करीत असतो व ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामध्ये आपण उद्याचे स्वप्न आजच्या पहाटेत पहात असतो.
ज्या प्रमाणे स्वप्न त्याप्रमाणे वागणूक होत असते. ही झाली प्रापंचिकाची गोष्ट.
आता प्रपंच करीत करीत ज्यावेळी मनुष्य प्रपंचातील तीसरा टप्पा गाठतो त्यावेळी त्याला या भावनेची चाहूल लागते.
पुर्वीच्या टप्यातील अनुभव जमेला धरुन मनुष्य आपले विचार बदलतो. कुठे थांबायचे याचे चिंतन करतो. मनाला आनंद कुठे मिळेल याचा शोध घेतो. तेथे तो ओळखतो की, आपल्या अपेक्षा आपण दुसर्यावर विसंबुन ठेवू नयेत. त्याचे ओझे इतरांवर टाकू नये.
जसे डॉक्टर वडिलांना आपला मुलगा डॉक्टरच व्हावा असे वाटते व त्याप्रमाणे तो नेहमी मुलाला तशी जाणीव करुन देतो. येथे वडिलांच्या मुलाविषयी अपेक्षा दिसते.
पण आता तो सज्ञान झाला आहे. आपले हित कशात आहे, त्यासाठी काय करावयाचे हे तो जाणण्याच्या वयात आला आहे. तेव्हा त्याला कांही सल्ला देण्यापेक्षा तो काय करतो आहे हे तिर्हाईतपणे बघणे याला निस्पृहता म्हणतात.
ज्या जेष्ठांनी प्रपंचात राहून ही वृत्ती अंगीकारली ते परमार्थाचे वाटेकरी झाले असे वाटते. ते नेहमी समाधानी असतात. जे समोर येईल ते मान्य करुन वागण्याची प्रवृत्ती त्यांचे जवळ येते.
आयुष्यात अशी निःस्पृहता येणे म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. आपण जेष्ठांनी तशी वृत्ती आणण्याचा प्रयत्न करुया..