या संसारात निरनिराळे धर्म आहेत. त्या त्या धर्माप्रमाणे इष्ट दैवत प्रसन्न करुन घेण्यासाठी तारक मंत्र सांगितले आहेत.
जैन धमामध्ये तारक मंत्र म्हणून नमो:कार मंत्र सांगितला आहे. हो अतिशय पूरांतन काळापासून सांगितला गेलेला मंत्र आहे.
या मंत्रामध्ये चौदा पूर्व भवाचे सार सांगितले आहे. हा मंत्र फार अर्थपूर्वक समजला जातो. त्याचा महिमा – प्रचिती पण अवर्णनीच आहे.
या मंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मंत्रामध्ये कोणत्याही विशिष्ठ भगवंताची आळवणी केली नाही.
या मंत्रामध्ये जैन धर्माचे जे सार आहे – जे चोवीस तिर्थकरांनी सांगितले आहे व त्याप्रमाणे ज्या साधु संतांनी आचरण केले अशा पंच परमेष्टी भगवंतांना नमस्कार केला आहे.
या पंचपरमेष्टी म्हणजे
1) अरीहंत
2) सिद्ध
3) भगवंत
4) आचार्य
5) साधु साधवी
यांना नमस्कार केला आहे. या सर्व पंचपरमेष्टीमध्ये जे 108 गुण आहेत ते सर्व आपणात येवो ही या मंत्रांची मागणी आहे.
या मंत्राचे पठणाने सर्व संचित पापाचे निवारण होते.
जो साधक अखंड या मंत्राचा जाप करतो त्याला या प्रपंचाच्या भवसागरातून पार पडण्यास परमेश्वर मदत करतो.
या मंत्रामध्ये नऊ ओळी आहेत व अडूसष्ठ अक्षरे आहेत.
हा मंत्र जपताना कोणतीही बंधने नाहीत. तेथे श्रीमंत गरीब असा भेद नाही.
हा तारक मंत्र साधकाने कुठेही पठण करावा. आपली नित्य कर्म करीत असताना – श्वासा बरोबर या मंत्राचे पठण करावे.
अंत:काळी हा मंत्र मुखात असावा व पुढे चांगली गती मिळावी यासाठी सतत या मंत्राचे पठण करीत रहावे असे तिर्थकरांची अर्जवून सांगितले आहे. या मंत्राचे गठण तिर्थंकर श्री पुष्पदंत स्वामी यांनी केले आहे.
कर्माशिवाय आपण राहू शकत नाही पण कर्मामुळे – कर्म दिपाकामुळे आपले जीवन अशांत होवू नये म्हणून सतत नमो:कार मंत्राचा जप करावा – भवरोग बरा करणारी ही एक जालीम बुटी आहे.
साधकाने या मंत्राची पारायणे करुन इष्ट फळ प्राप्ती करुन घ्यावी.