अशांत मन कांही हितकारक काम करु शकत नाही. असा या उक्तीचा अर्थ आहे.
मन शांत असेल तरच सर्व कामे व्यवस्थित पार पडतात. म्हणतात ना मन चंगा तो कठौटी में गंगा ।
अशांत व असमाधानी मनाला कोणतीही गोष्ट असाध्य होते. कोणत्याही गोष्टीचा समन्वय जोडणी व्हायची असेल तर प्रथम त्या गोष्टीचा शांततेने व समन्वयाने विचार करणे गरजेचे असते. हा समन्वय बाह्य गोष्टींनी साधत नाही.
तेथे शांत मनाची गरज असते व हे शांत मन करण्यासाठी चिंतनाची गरज असते.
ही गरज जेव्हा लक्षात येते तेव्हा प्रापंचिक कितीही गडबड गर्दीत असला तरी तो शांतपणे योग्य मार्ग काढू शकतो.
ज्याला कांही शोध घ्यावयाचा आहे. त्याने प्रथम आपले मन शांत व शुद्ध करावे. नंतर दृढ निश्चयाने श्रद्धेने केलेले चिंतन त्याचे मनावर चांगले संस्कार करु शकतात व तो यशाच्या उच्च शिखरावर विराजमान होतो. अंतर्मनाचा गोंधळ थांबतो.
शांत मनाने सर्व कामे यशस्वी होतात.