दया तेथे धर्मु । धर्मु तेथे सुखागमु । सुखी पुरुषोत्तम । जेसे जैसा ||

श्रेष्ठ धर्म व श्रेष्ठ पुरुष कोण?

याबद्दल सांगताना ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, ज्यांच्या जवळ दयाभाव आहे. ज्याचे येण्याने सुखसमृद्धी प्राप्त होते, तो उत्तम पुरुष मानला जातो.

तर समर्थ रामदास म्हणतात, जो स्वत: कष्ट करतो, इतरांसाठी रात्रंदिवस कष्ट उपसतो, इतरांची दु:खे कमी करण्याचा प्रयास करतो, इतरांसाठी स्वत:चा देह झीजवतो, झळ सोसतो अशा पुरुषाला उत्तम पुरुष जाणावे.

अशा या उत्तम पुरुषाची तुलना अगरबत्तीशी करायची झाली तर जशी अगरबत्ती स्वत:ला जाळीत जावून इतरांना सुगंध देते. चंदनाच्या तुकड्याप्रमाणे इतरांना शांती सुख लाभावे म्हणून स्वत:ला घासून घेवून इतरांना गंध देते.

निस्वार्थीपणे इतरांची सेवा करणारे, संत महंत पुरुषोत्तम होतात.

परमेश्‍वर पण त्यांच्या या वृत्तीमुळे प्रसन्न होवून त्यांचेवर समाधानाची फुले उधळतो.

पुरुषोत्तम हा चिंतामणी प्रमाणे असतो. त्यांच्या सानिध्यात अनंत विघ्ने नष्ट होतात.

अशा या पुरुषोत्तमाचे मुखी सदा सर्वदा नम्र भाव असतो. त्यामुळे तो जिथे जातो तिथे सर्व मंगलमय होत जाते.

1 Comment

  • सो. शिला केतकर
    Posted June 19, 2022 2:18 pm 0Likes

    येथे धर्माप्रमाणे आचरण आहे तेथे निश्चितच सुख येते
    धर्म म्हणजे हिंदू-मुस्लीम इत्यादी प्रमाणे धर्म नसून मानवता धर्म म्हणजेच आणि दया क्षमा शांती आहे आणि अशा पद्धतीने मागणारे संत पुरुषोत्तम होतात अगदी खरे आहे फार छान
    राम कृष्ण हरी🙏

Leave a comment