मोगरा फुलला या निसर्गातील बदलाचे ज्ञानेश्वर माऊलींनी एका सुंदर अभंगातून वर्णत केले आहे.
त्यात ते म्हणतात, जीवनाची सुरवात आपण एखादे छोटेसे रोपटे लावून करतो.
त्याला खतपाणी घालीत घालीत ते रोपटे वाढत वाढत जाते.
जीवनात आपणाला जे हवे ते सर्व मिळते. तेथे एखाद्या रोपट्याचे वेलीत रुपांतर होते त्या वेलीला एखादे फुल लागते.
त्याचे सौंदर्य, सुगंध आपणाला आवडतो त्या आवडीतून आपण अनेक फुलांचा बहर वेलीवर पहातो.
येथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोगरा फुलला, रोपट्याची वेळ झाली, ती नुसती बहरली नाही तर तिचा विस्तार गगनावर गेला.
तसे तुम्ही जीवनात सर्व क्षेत्रांत उत्तम पद प्राप्त केले.
तुम्ही प्रपंच करीत करीत परमार्थाचे दारात पोहचला.
या दारात उभे राहून तुम्ही त्या फुललेल्या मोगर्याचे स्वरुप, सौंदर्य पहात आहात.
आता तुम्हाला कशाची आसक्ती उरली नाही. सदा बहारणारी तुमची मोगर्याची वेल गगनावर चढत गेली आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीनाथा तू आपल्या ह्रदयात कुंडलिनीचक्रात मुलाधाराचे रोपटे लावले, तेथून ते संक्रमीत झाले तेथे माझ्या साधनेला सुरवात झाली.
प्रपंच करता करता पृथ्वीच्या फेर्यात पंचमहाभूताची असलेली दोन दोन चक्रे कार्यान्वीत झाली.
आप म्हणजे जलतत्व, तेज म्हणजे अग्नितत्व तसेच वायु व आकाश ही पण तत्वे आहेत.
शरीरामध्ये पण पृथ्वीची दोन चक्रे – मुलाधार, स्वाधिष्ठाण.
जलतत्वाचे दोन चक्र म्हणजे – मणीपूर आणि अनाहत चक्र.
तसेच तेजाची, वायुची व आकाशाची एक एक चक्रे म्हणजे विशुद्ध, आज्ञा व सहस्त्राधार चक्रे.
पृथ्वी व जल यांना दोन दोन चक्रे आहेत. म्हणून माणसाला दोन गोष्टींचा सर्वाधीक गरज असते.
तेथे द्वैताचा प्रभाव दिसून येतो. तो प्रभाव मानव देहातच दिसतो. त्यातून त्याला पुढे जायचे असते तेव्हा या मानव जन्मातील एक एक चक्र पार करीत मोगर्याचा वेल पुढे पुढे वाढत आहे.
मानव भौतिकातून पुढे सरकत आहे. तसा मोगरा अधिक अधिक फुलायला लागतो. त्याचा सुगंध इतरांना ही जाणवायला लागतो.
तेथे ह्रदयातून भक्ती प्रगट होण्यास सुरवात होतेे. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होवू लागते.
तेथे मोगर्याचा वेल आणखी वाढतो.
तो वेल तेजाकडे सरकतो त्याची वासना, मोह, राग, क्रोध यांना तो जाळून टाकतो. त्यावर विजय मिळविते.
ज्ञानराज माऊली पुढे म्हणतात. या सर्व विषयावर विजय मिळविण्यावर निवृत्ती दादांनी मला वायु कडे नेले.
वायुतत्व निर्गुण निराकार आहे. तेथे माझा विवेक जागृत झाला. तेथे माझ्याकडून खूप कांही काम करवून घेतले तेथे मला हे माझे कर्तृत्व नाही हे लक्षांत आले तेथे मला गुरुमाऊलींचे अधिष्ठान लाभले.
नंतर मोगर्याचा वेल आकाशाला भिडतो. तेथे संपूर्णपणे निर्गुण निराकार असा भगवंताचे सगळे गुंते सुटले. सर्व अंदोलने विरुन गेली.
तेथे मी तटस्थपणे निर्गुण निराकार परमेश्वराकडे पहात राहिले.
सर्व गुंता आता मी परमेश्वराला आर्पण केला तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही वाढलेली वेल मी तुलाच अर्पण करीत आहे.
तिचा तू स्विकार कर व आम्हाला आनंदी समाधानी ठेव.
2 Comments
Tanmay Bhandari
मुळा झाड चक्रातून निघालेला मोगऱा सहस्राधार चक्रा पर्यंत जाऊन कुंडलिनी जागृत होणे आणि मोगरा फुलला म्हणजे प्रपंचातील आसक्ती कमी होऊन
ब्रम्हानंदा कडे ही संकल्पना फारच आवडली🙏
Tanmay Bhandari
मोगरा फुलाला यावर केलेले चिंतन फारच सुंदर
मोगरा फुलला याची सांगड नवा चक्रांची घातलेली आहेत ही फारच सुंदर कल्पना आहे