मन प्रसन्नतामेती पूज्यमाने जिनेश्‍वरे!

जिनेश्‍वर म्हणजे देवांचा देव इंद्रदेव, तिर्थंकर भगवान यांना प्रभातकाळी उठून वंदन केले असता मनाला प्रसन्न वाटते. मनशुद्धी होते, देहशुद्धी, ह्रदयशुद्धी होवून सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो व त्यामुळे इच्छित कार्य सिद्धी होत जाते.

अशा आनंदी मनाने जे स्वप्नात आपण पहातो ते कृतीत करण्याचा प्रयत्न आपण करतो व असा प्रयत्न परमेश्‍वर पूजनाने सफल होतो.

म्हणून साधू, संत नेहमी हाच उपदेश करीत असतात.

मनः प्रसन्नतामेति पूज्यमाने जिनेश्‍वरे !

हे देवादिदेव जिनेश्‍वर भगवान आहेत तरी कसे?

तर या भगवंतांनी आपले मन मद, मोह, माया या पासून अलिप्त केले आहे. तो भाव त्यांचे दर्शनातून आपल्या मध्ये येतो.

तिर्थंकर भगवंतांचे पस्तीस गुण या दर्शनामुळे आपणाकडे संकलित होतात. त्यामुळे सर्वांवर प्रेम करा ही भावना मनात येते व आपले मन प्रसन्न होते.

असे मन काया, वाचा, मने कुणाला दुखवत नाही व जर दुखवले गेले तर त्याची क्षमा याचना करण्यास तयार होते.

हे तिर्थंकार भगवानच आसक्ती, द्वेष, वैरभाव इत्यादी विकारावर संयम आणण्याचा मनाला संदेश देतात. त्याचे दर्शनानेच आपण विषय मुक्त होतो.

प्रपंचात आपण भगवंत सोडून इतर गोष्टीची पूजा करीत असतो. त्यामुळे मनांत विचारांचे काहुर माजते. तेथे विचारांचे द्वंद्व उठते. हे करावे कां ते करावे असा संभ्रम उत्पन्न होतो.

पण जर आपण वितराग भगवंताला पूजले तर कोणत्याही प्रकारचे द्वंद मनांत उमटणार नाही. तो प्रभु जिथे आहे, तेथे त्याला सर्व विकार येऊन मिळतात. आपली शरणागती देतात.

म्हणून प्रत्येक साधकाने भगवंत पूजेचा नियम करावयाचा आहे. सुरवातीला एक दिवसाचा आणी हळू हळू नित्याचा नियम घ्यावा व जिनेश्‍वराला पूजावे यामुळे जीवनांत चमत्कार घडून येईल.

जीवनांत स्वर्ग सुख मिळेल. तुमच्या सर्व कामना सफल होतील म्हणून म्हटले आहे.

‘‘मन प्रसन्नतामेती पूज्यमाने जिनेश्‍वरे’’

1 Comment

  • सौ. शीला केतकर
    Posted October 16, 2022 12:44 pm 0Likes

    👆👌🙏
    जिनेश्वर म्हणजे इंद्र हे मला माहीतच नव्हते आजच्या आपल्या लिखाणातून ते समजले.

    परमेश्वराच्या पूजेने मन निश्चितच प्रसन्न होते मनात येणारे अन्य विचार थोड्या कालावधीसाठी तरी बाजूला होतात मन प्रसन्न होते. हे सत्य आहे
    🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment