आईची महती, तिचे कष्ट कसे अनमोल आहेत हे जाणवून देणारी ही कविता आहे.
आई म्हणून जगून बघ
थकत नाही कधी, तरी ती निवांत,
तिला बसवून बघ, दोन शब्द बोल प्रेमाचे, मनमोकळ हसवून बघ,
अन् एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगुन बघ,
तूच माझा स्तोत्र प्रेरणेचा, कधी तिला सांगुन बघ.
कधीतरी तिच्यासाठी दीर्घ आयुष्य मागून बघ.
अन् एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ.
जिथे इतरांना समजावणे कठीण असतं तिथं स्वत:च्या आईला समजावून घेणं चांगलं असतं.
म्हणून आईला समजावून घे.
आईकडे पहाताना आपले विचार सरळ ठेव, मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी असली तरी कांही फरक पडत नाही,
तेथे आईला तू विसरु नको.
वास्तव बेवारसपणे पडलेलं असतं, गैर समज निवांत फिरत असतात.
विश्वात मातेचा विवेक त्याला न्याय देते.
म्हणून म्हणले आहे.
लवकर जाग येणं खूप फायद्याचं असतं, मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असो,
तुमच्यासाठी निर् अभिमानी होणं आईसारखं कोणी नसतं.