मेक (make) – बनव इंग्रजी दोन अक्षरी शब्द.
मेक यातून बरेच अर्थपूर्ण शब्द तयार झाले, गम्मत वाटली.
सहज विचार केला मेक या शब्दात काय मेख आहे. तेव्हा लक्षात आले की हे बनवा बनवीचे राजकारण आहे.
प्रपंचात माणूस रोज हे बनव ते बनव, ही गाडी बनव ती गाडी बनव, यात त्या सुविधा कर, त्यात या सुविधा कर, अशा अनेक प्रकारची कसरत रोज करत असतो व या कसरतीतून सुंदरशी कलाकृती निर्माण होते.
ती कलाकृती पाहून इतर लोक तोंडात बोटं घालतात व कौतुकाने म्हणतात याचा मेकॅनिक कोण आहे. तेथे मेक पासून मेकॅनिक तयार होतो. असा हा मॅकॅनिक गप्प बसत नाही. तो जिद्दीने सातत्याने प्रयत्न करीत करीत अनेक अनेक मेकॅनिक बनविण्याचा चंग धरतो.
तेथे त्याला मेकॅनिकल इंजिनिअरींगची शाळा सुरु करावी लागते. तेथे हजारो छात्र प्रवेश घेतात व नवे नवे प्रकल्प बनविण्याचे तंत्र शिकून घेतात.
येथे बनवा बनवीचे महाविद्यालय सुरु झाले.
या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेवून अनेक प्रकल्प उभे करु लागले तेथे पण ही बनवा बनवी पुरी पडेना. तेव्हा जागतीक स्तरावर बनवा बनवी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअर होण्यासाठी शोधाशोध सुरु झाली. ही शोध मोहिम इतकी पसरली, की त्यातून आयटी क्षेत्राची उभारणी झाली. जगभरात या बनवा बनवीचे क्षेत्र किती आहे याचा रोज अभ्यास सुरु झाला. त्यासाठी विद्यार्थ्यांची जगभरात आवकजावक सुरु झाली. तेथे चुरस सुरु झाली. मी पण बनवा बनवी करणार. तेथे कुणी कुणाला आडवू शकत नव्हते.
तेथे मात्र मला एक मेख दिसली, ती अशी – एकाला ज्ञान होते बनविण्याचे पण बनविण्यासाठी त्याच्यापाशी मनुष्यबळ नव्हते.
दात होते पण चणे नव्हते. तर दुसरीकडे चणे होते पण दात नव्हते. अशी मेख जागतिक स्थरावर दिसत होती.
या मेक ची मेख ओळखुन एका देशांतील अनेक मजूर दुसर्या देशांत बनवा बनवी करण्यासाठी येऊ जाऊ लागले.
या बनवा बनवीत जवळजवळ रहाणारी, एकत्र कुटूंबात वावरणारी एका मेके भोवती फि रणारी माणसे दूर दूर पसरली गेली. वडिलोपार्जीत असलेली बहुएकरी जमिन नापीक होवू लागली. बनवा बनवी करणारी अनेक माणसे एका देशातून दूसर्या देशांत फि रु लागली व त्यांच्या थापाला भुलून अनेक जण त्यांचे पाठीमागे धावू लागली.
जिकडे पहावे तिकडे धावपळ, गर्दी कुणाला शांत बसून विचार करण्यास वेळ नाही. कुणाला आपण स्वत: काय करु शकतो हे लक्षात घेण्यासाठी वेळ नाही. चिंतनाचा अभाव सर्वत्र होत चालला व माणसाची त्रेधा तिरपीट सुरु झाली.
हे सर्व उघड्या डोळ्यांनी जेव्हा मी पाहू लागलो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर यातील मेख दिसू लागली. मी त्या मेकचा विचार करु लागलो.
स्वप्नात मला दिसले की आपला मेक कोणता आहे.
जो आपल्याशी बनवा बनवी न करता आपणास सर्व उपलब्ध करुन देतो तो कोण आहे ?
तेथे माझ्या डोळ्यासमोर ज्योत प्रकाशित झाला व मी स्वप्नातून जागा झालो मला परमेश्वराची मूर्ति समोर दिसली.
मी खाडकन जागा झालो व दोन हात दोन गुडगे व मस्तक त्याच्या चरणाशी टेकवून त्या विधात्याला नमस्कार केला. कारण तो निस्पृह, निरिब्ध असा मेकॅनिक होता व आहे.
यासर्व ज्ञानातून घ्यायचे काय तर तूच आहे तुझ्या जीवनाचा कर्ता आणि करविता.
कुणाच्या बनवा बनवीवर विश्वास ठेवू नकोस व त्याच्या बातेवर विश्वास ठेवून स्वत:चे अध:पतन करुन घेवू नकोस. आत्मपरिक्षण कर, आत्मनिर्भळ काम करण्यास सुरवात कर.
जमिनी वर खंबीरपणे पाय रोव. ती मेक बनावट तुला काही कमी पडू देणार नाही.
जगभर पळणार्या या नविन पिढीस जेष्ठ नागरिकांनी त्या पळणार्या बालकाचा मेक दाखविला पाहिजे व अलगत त्या मेक ला बांधून ठेवले पाहिजे. तर ते आदर्श मेकॅनिक होतील.
