वर्गीकरण ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेतून वेगवेगळ्या प्रवृत्तीचे प्राणी वेगवेगळे केले जातात व त्याचेतील गुण दोष समोर येतात.
मानव प्राण्यांचे तीन प्रकार आहेत.
1) सकाम कर्म करणारे –
कांही ध्येय मनांत ठेवून कर्म करणारे त्यांना त्यांचे कर्माप्रमाणे चांगले अगर वाईट फळ भोगावे लागते. एखाद्याला त्यासाठी पुनर्जन्म पण घ्यावा लागतो.
2) निष्काम कर्म करणारे – निष्काम कर्म करणार्याला त्याचे आयुष्य संपताच चांगली गती प्राप्त होते त्याचा पुनर्जन्म टाळला जातो.
3) नुसतेच जगणारे – आयाराम गयाराम असे – जीवन बेसावधपणे जगणारा. मनुष्य जन्माचे महत्व न जाणून येईल तसा दिवस घालविणारे. देहाच्या उपभोगात रमणारे.
त्यांच्या पुनर्जन्माला अंत नसतो. ते चौर्याऐशी लक्ष जीवांचे फेर्यांत अडकतात.
जन्माला आले व गेले एवढेच त्यांचे अस्तित्व असते.
या विवेचनावरुन असे लक्षात येईल की मनुष्य प्राण्याचे वर्गीकरण त्याच्या कर्मावर होते.
श्रीमंती संपत्ती यामागे धावणारा. रोज नवी स्वप्न पाहून ती साकार करण्यासाठी धडपडणारा एक वर्ग आहे. त्या वर्गात प्रचंड गर्दी आहे. याच लोकांमुळे स्वर्गाला शांतता आहे. स्वर्गलोक आनंदात आहे. या वर्गातील लोकांची नरकात पाठवण केली जाते.
या विवेचानातून काय टिकायचे मनुष्य प्राण्यांचे नविन तीन श्रेणीत विभागले आहे जसे रेल्वेमध्ये विविध श्रेणीत वर्गीकरण केले जाते.
ज्यांना प्रथम श्रेणीने प्रवास करावयाचा त्याने निष्काम कर्म करीत रहावे.
ज्यांना अद्याप प्रपंचात राहून प्रवास करावयाचा आहे. त्याने मनांत ध्येय ठेवून आरक्षण करुन द्वितीय श्रेणीने प्रवास करावा.
ज्यांना नुसताच प्रवास करावयाचा आहे, मिळेल त्या ठिकाणी बसून वेळी दरवाजाला लटकून प्रवास करायचा त्यांनी आरक्षण न करता प्रवास करावा. पण त्यांना प्रवासाचे सुख-समाधान मिळत नाही. उलट त्यांची जीवनात नुसतीच धावपळ होते.
जेष्ठ नागरिकांनी आता दगदग करुन तिसर्या प्रकारच्या कक्षेत बसून प्रवास करु नये. प्रथम श्रेणी चे आरक्षण करुन जीवन जगावे.