प्रपंचात दोन व्यक्ती, एक पुरुष व एक स्त्री वेगवेगळ्या घरातून येवून एकमेकांना सांभाळून घेण्याची शपथ घेण्याचे कार्य करतात.
स्त्रीला नवरा किती जरी वेंधळा असला तरी त्याला सांभाळून घ्यायचं असतं. पुरुषाला तिने कसाही स्वयंपाक केला तरी त्याला मस्त म्हणायचं असतं.
नवर्यासाठी आपल्या आवडीनिवडीवर पाणी सोडीत त्याच्या बरोबर आवडलं म्हणायचं असत. कपड्याच्या दुकानात जाण्याचा कंटाळा आला तरी तिच्यासाठी आनंदाने दुकानात जायचं असत.
प्रपंचात पराकोटीचे मतभेद असले तरी झाकली मुठ सव्वालाखाची समजायचे असतं, याला लग्न म्हणायचं असतं.
दोन्ही घरांची नाती आपुलकीने जपायची याला लग्न म्हणायचं असतं.
छोट्या मोठ्या कलहात सावरतं घेणे याला लग्न म्हणतात.
वेळ प्रसंगी आपल्या इच्छा आकांक्षा यांना हसत हसत विसरायचं याला लग्न म्हणतात.
आयुष्याच्या आखरीपर्यंत असेच एकमेकांसाठी जगु, हे दिले घेतलेले वचन म्हणजे लग्न होय.
आयुष्यात शब्दाने शब्द वाढतो, त्यातून गैरसमज वाढतात, नाती मारली जातात.
तेव्हा लग्नात ज्याप्रमाणे दोन हातांची ओंजळ करुन शपथ घेतात, तसं प्रपंचात एकमेकांवर विसंबून रहाण्याची शपथ घेणे याला लग्न म्हणतात. या शपथीमुळे नाते टिकेल, थोडेफार कष्ट होतील, पण लग्न सार्थकी लागेल.
प्रत्येक स्त्री नवर्याला लग्नानंतर आपल्या मिठीत ठेवण्यासाठी धडपडत असते. पण कांही ठिकाणी स्त्री नवर्याला मिठी ऐवजी मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करते.
तेथे तिचे गणित चुकते.
संसार हे मुठीचे नाहीत मिठीचे प्रकरण आहे हे ज्यांना कळले ते उत्तम संसार करु शकतात.
अशाप्रकारे प्रपंचातील नाती मुठीत म्हणजे अधिकारात, जबरदस्तीत घुसमटतात, तर मिठीत फुलतात.
हे जिथं व जिला समजते ते लग्न होय.
लग्नानंतर माहेरपणाला आलेल्या मुलीला वडील एक सुगंधी आगरबत्तीचा पुडा देतात व सकाळी पुजेला बसताना आठवणीने आगरबत्ती लाव असे सांगतात. मनांत विचार येतो, प्रथमच माहेरपणाला आलेल्या एका मुलीला एखादी मोठी वस्तु देण्या ऐवजी काय तो अगरबत्तीचा पुडा दिला. सासरी वडीलांनी दिलेला आगरबत्तीचा पुडा पाहून सर्वांनीच नाक मुरडले. मुलींने मात्र सकाळी उठल्यावर पूजा करताना आगरबत्तीचा पुडा उघडला. त्यातून वडीलांनी पाठविलेली चिठ्ठी ती मुलगी वाचते. बेटा, ही अगरबत्ती स्वत: जळते, पण संपूर्ण घराला सुगंधी करुन जाते. एवढच नाही तर आजुबाजूचा परीसर ही दरवळून टाकते. तेव्हा लग्न म्हणजे बापाने मुलीला माहेरपणाला आल्यावर दिलेली सुंदर असुंगधी अगरबत्तीची भेट होय.
हे भारतीय संस्कृतीचे संस्कार होत. लग्नात दिलेली मोठी भेट होय.
मधुराभक्ती पारमार्थीक लग्न
आयुष्याची अर्धांगीनी जिथे मिळते ते लग्न ती मरणशय्येवर पहुडली आहे. मरणाच्या दारात उभा असतानाही तिचा हात त्याच्या गालावरुन फिरत आहे. जणुकाही हा आयुष्याचा शेवट नाही तर सुरवात आहे, तो तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी पहातोय. त्याला वाटतं तिनं उठावं अन त्याला मिठीत घ्यावं. त्याला सावरावं, त्याच्या बरोबर चार पावले चालावं. त्याच्या मनांतील ही तगमग तीने ओळखली. कूस बदलून त्याच्या डोक्यावर हात फि रवून त्याचे केस कुरवाळून मी आहे ना तमुच्या सोबत.. चा आधारही देत असेल.
या दोघांची ही कृती पाहून आजुनही जगायचं राहुनच गेलं तुझ्या शिवाय. चल आता तरी जगुया एकमेकांसाठी असचं अगदी अस्सचं त्याला वाटतं आणि तिच्या खांद्यावर त्याने डोक ठेवलं. बालहट्ट धरुन रडाला तर नसेल ना तो. खरचं तो व्याकूळ दिसतोय, कारण त्याच अर्ध झाड आडवं झालय आणि मोकळ्या आभाळाखाली तो एकटा निरागस निराधार झालाय तिच्या शिवाय.
ही वेळ आपल्यावर ही येवू शकतो. म्हणून आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला जपा, त्याला गमावू नका, त्याच्या/तिच्या भावना समजून घ्या. प्रेम द्या.. आणि प्रेम घ्या.
अशी आहे ही लग्नाची भेट. प्रत्येकाच्या आयुष्यात ही भेट थेट जाऊद्या जीवन सेट होवू द्या !