कृपा असु द्यावी मज दीनावरी। जातसे माहेरी, तुका म्हणे.

प्रपंचात वावरत असताना, ज्याप्रमाणे तारुण्यात लग्न, नंतर माहेर, सासर अशा प्रक्रिया चालू असतात व त्यात आपण अडकून जातो. त्यातून आपणास वृद्धावस्था येते.

इथपर्यंत सर्व व्यवस्थित झालेले असते. ही सर्व परमेश्‍वराची कृपा-आशिर्वाद आहे, असे तुकोबा म्हणतात.

पुढे जावून या प्रपंचातून म्हणजे सासरातून विश्रांतीसाठी माहेरी कसे जायचे याचे वर्णन तुकोबा या अभंगात करतात.

ते म्हणतात परमेश्‍वरा, आतापर्यंत आमचेवर कृपा केली सर्वकाही चांगले झाले, आता विश्रांतीसाठी आम्ही माहेरी जात आहे.

ती मुलगी माहेरी जाणेसाठी जशी अधीर होते तसा मी परमात्म्याला भेटण्यासाठी आधीर झालो आहे.

मला तसा आशीर्वाद दे व मला प्रपंचातून मुक्ती दे.

हीच ती वेळ, जेव्हा प्रपंची माणसाने प्रपंचात थांबायचे व अधिर होऊन प्ररमात्म्याकडे धाव घेण्याची.

येथे प्रपंची माणसाने प्रपंचातील राग, लोभ, क्रोध, लालसा, वासना या गोष्टींचा वियोग करावयाचा असतो. स्थिर बुद्धी ठेवून प्रपंचात स्थिर रहावयाचे असते व माहेरची – स्वर्गाची वाट धरायची असते.

आई, वडील, मुले, मुली, सुना, नातेवाईक या सर्वांचा त्याग करावयाचा व एकला चल या न्यायाने रहाण्याचा प्रयत्न करायचा – करीत रहावयाचे.

हे करीत असताना ज्याप्रमाणे तुम्ही प्रपंचात वैभवाच्या शिखरावर गेला त्याप्रमाणे तुम्हाला परमेश्‍वर अलगद उचलून आपल्या शेजारी बसवेल.

कोणत्याही गोष्टींचा गाजावाजा न करता शांतपणे मौनात राहून विठ्ठल चरणी एकरुप व्हा.

अशाप्रकारे संत तुकोबांनी अतिशय सोप्या भाषेत, सर्वांना समजेल असे वैकुंठ गमनाचे गुढ नजरे समोर ठेवले आहे.

त्यांनी जसे षडविकारावर प्रभुत्व मिळवून सर्वांना आपल्या मायेच्या पंखाखाली सामावून घेतले व प्रपंचातून गरुड भरारी घेवून परमात्यापर्यंत झेप घेतली

धन्य ते संत .. धन्य ती भारतीय संस्कृती, तिला नाही जोड जगता माजी॥

1 Comment

  • सो. शिला केतकर
    Posted June 22, 2022 6:39 am 0Likes

    तुकारामांनी दिलेली उपमा मुलीला माहेरची ओढ असते अशीच तुकाराम महाराजांना परमात्म्याला भेटण्याची ओढ आहे
    माहेरची ओढ आणि परमात्मा भेटीची ओढ यात भावनिकता एक च

    माउलींनी सुद्धा भेटी लागे जीवा लागलीसे आस या मध्ये चकोरा ला पौर्णिमेच्या चंद्राची आस लागते तशी परमात्मा भेटीची आस आहे असे वर्णन केले आहे

    आपल्या मता प्रमाणे माये मध्ये न गुरफटता आणि षड् विकारांवर विजय मिळवून परमात्म्याला भेटावे 👌🙏 राम कृष्ण हरी

Leave a comment