मागणे म्हणजे ‘याचना करणे’, एखाद्याचे वस्तु स्वत:च्या स्वार्थासाठी मागणे याला याचक म्हणतात.
तसेच समाजामध्ये दानशूर व्यक्ती असतात इतरांच्या गरजा अगर मागणी पाहून दान देणारे दानशूर असतात असा हा देण्या घेण्याचा व्यवहार सतत चालू असतो.
दानशूर असतो त्याला समाजात मान मराताब मिळते. त्याला आपल्या दानशूरत्वाचा अहंकार होतो. याचक पण प्रपंचातील अडी अडचणीला कंटाळून याचना करीतच रहातो.
असा हा दाता व भोक्ता यांचा बाजार प्रपंचात दिसतो. जसा हा बाजार प्रपंचात दिसतो तसा परमार्थात पण दिसून येतो.
महाभारत मध्ये कौरव पांडवांचे युद्ध झाले. श्रीकृष्ण हा दोघांचा संबंधी होता. दुर्योधन व अर्जुन त्याचेकडे मदतीसाठी याचना करणेसाठी गेले दुर्योधनाला श्रीकृष्णाचे अफाट सैन्य, युद्धसामुग्री याचा मोह होता त्याने प्रथम मागणी केली ती युद्धा सामग्री व सैन्य यांची श्रीकृष्णाने ती कबूल केली नंतर श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहिले. अर्जुनाने नमस्कार करुन श्रीकृष्णास आपल्या रथात बसून फक्त सारथ्य करण्याची विनंती केली पुढील कथा आपण जाणतोच.
अर्जुनाला कळले आपण काय मागावे व जे आपल्या पदरी पडले आहे ते मोटे पवित्र आहे. मात्र दुर्योधनाला मोह पडला अफाट शस्त्राचा सैन्याचा तेथे विनाश काळी विपरीत बुद्धी झाली व पांडवांनी युद्ध जिंकले.
येथे लक्षांत येते देणारा दानशूर आहे. कल्पवृक्ष आहे पण आपण त्याच्याकडे काय मागावयाचे ? ज्या साधका जवळ विवेक असतो मद, मोह, माया नसते तो योग्य तीच गोष्ट मागतो किंवा कशाचीही मागणी करीत नाही.
फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करीत जातो परमेश्वर त्याच्या पाठीशी असतो. काही मागु नका निष्काम कर्म करा तेथे तुम्हाला कळेल काय मागावे.