समाधी म्हणजे एकरुप होणे, विलिन होणे, वेगळे अस्तित्व न रहाणे. अशी समाधी आवस्था येणे मोठी भाग्याची गोष्ट असते. हे मोठे दिव्य असते.
म्हणूनच म्हणतात, दिव्यत्वाची जिथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती .
मनुष्य जन्माला येतो व मृत्यू पावतो. मृत्यूनंतर त्या शरीराचे पंचमहाभुतात विलीनीकरण होते व त्याचे तेथूनच दूसर्या रुपाने प्रकटीकरण होते यालाच जन्म मृत्यूचा लपंडाव म्हणतात. हा लपंडाव अनादीकाला पासून चालत आला आहे.
ऋषि मुनींनी जिवंतपणात स्वत:ला समाधिस्त करुन घेतले. याची आठवण आपणाला निरनिराळ्या नोंदीतून होते. ते ऋषिमुनी समाधी घेतल्यावर कांही कालांतरानंतर पंचमहाभूतात विलीन झालेले संदर्भपण सापडतात. ही प्रक्रिया झाली जीवंत समाधीची.अशा संतांची अनेक उदाहरणे आपणास सापडतात.
आता आपण संजीवन समाधी काय आहे हे पाहू. संजीवन म्डणजे वर्षानुवर्षे आहे त्याच स्थितीत असणे. त्यावर वाहिलेली फुलेे, फळे प्रसाद जसाचे तसा रहातो. त्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात.
त्या समाधीचे चैतन्य अनंत अनंत काळपर्यंत टिकून रहाते. त्या समाधीतून सृष्टीच्या गरजेप्रमाणे संतांचे पुन्हा पुन्हा प्रकटीकरण होते. त्याचे पंचत्वात विलिनीकरण होत नाही. ही संजीवन समाधी होय.
अशी संजीवन समाधी एकच एक म्हणजे ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची ती आळंदी येथे आहे. अशी संजीवन समाधी दूसरीकडे कोठे सापडत नाही.
जीवंत समाधी ही प्रापंचिकातून होते. प्रापंचिकाचे सर्व भोग फिटे पर्यंत त्याने घेतलेल्या समाधीतून अनेक जन्म त्याला घ्यावे लागतात. त्यांचे पंचमहाभूतात विलीनीकरण होत जाते.
मात्र संजीवन समाधी ही अनोखी समाधी आहे. त्या समाधी पुरुषाला अनोखा अनुभव आलेला असतो. म्हणून या समाधीला वाहिलेली फुले, फळे, प्रसाद हा वर्षानुवर्ष तसाच रहातो व सृष्टीच्या गरजेप्रमाणे त्या सद्भगवंताचे स्वरुप लोकांचे समोर येते रहाते.
हे स्वरुप आनंदी अविनाशी असते. येथे आपण वावरत असलेला समाधीसाठी जिवंत व संजीवन या शब्दातील फरक नजरे समोर येतो.
ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे वर्णन करताना म्हणले आहे.
ज्ञानेशाची समाधी स्थिती,
पुनःश्च येणे देहा (परती) वरती,
याची घेतली प्रचिती,
त्रिशतकोत्तर नाथांनी ।
पूर्वजांनी जया पाहिले,
तया नाथांनी देखिले,
आज तैसेची संचिले,
समाधिस्त ज्ञानेश्वर…
अशा या जिवंत समाधिस्त व संजीवन समाधिस्त महा पुरुषांना कोटी कोटी प्रणाम .
तेथे म्हणावे वाटते दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.
1 Comment
सो. शिला केतकर
🙏 जिवंत समाधी संजीवन समाधी यांच्यातील फरक डॉक्टर साहेब तुम्ही फारच स्पष्टपणे दाखवला आहे
हल्ली अनेक ठिकाणी एखादा
सत्पुरूष गेल्यावर त्याची संजीवन समाधी असे म्हणतात हा फरक समजला तर तसे म्हणणार नाही
राम कृष्ण हरी🙏