जीवनात प्रेमाची गरज व प्रेम करण्याची कला

जीवन जगत असताना माणसाला अन्न वस्त्र निवारा या गोष्टीचा अत्यंत गरज असते. त्याच बरोबर प्रेमाची, आपुलकीची पण गरज असते.

जसे जेवताना सर्व पदार्थ तयार केलेले असतात. पण त्यांत मीठचं नसेल तर ते जेवण आळणी होते. त्यांत स्वारस्य वाटत नाही.

आयुष्य जगत असताना माणसाला सर्व असले तरी त्या जोडीला प्रेम, आपुलकी नसेल तर सर्व व्यर्थ जाते. प्रेम हे अनेक प्रकारचे असते.

आई-वडील करीत असतात ते प्रेम पती-पत्नी यांच्यातील प्रेम, मित्र-मित्रामधील प्रेम एवढेच नाही तर मनुष्य व ईश्वर यांतील प्रेम हे सुद्धा फार मोलाचे प्रेम असते.

आई-वडील मुलाला मोठा करणेसाठी आयुष्यभर प्रेमाने कष्ट करीत असतात. नको तेवढा त्याग करतात. हे सर्व मुलाच्या प्रेमा खातर. मुलगा मोठा होतो, चांगला कमाऊ लागतो, मात्र त्याचे लक्ष त्याचे प्रेम खेड्यात कष्ट करीत असणार्‍या आई-वडीलाकडे रहात नाही.

आई-वडील त्याच्या प्रेमाला दूरावतात. ते दु:खी होतात. आयुष्याच्या तिसर्‍या टप्प्यावर जगत असताना त्यांचा हिरमुस होतो. ना ईलाज म्हणून ते जगत असतात. येथे लक्षात येते जीवन जगत असताना प्रेमाची गरज.

एकाद्या व्यक्तीला आपण जवळ केले. मित्र म्हणविले तर आयुष्यात त्याला कधीही धोका द्यायचा नसतो. त्याच्या जवळ असणार्‍या एखाद्या चांगल्या गुणामुळे तो जवळ आलेला असतो. त्या गुणाला साद द्यावयाची असते. असे आचरण प्रत्यक्षात करणे मोठे दिव्य असते. त्यासाठी मनाची ठेवण तशी तयार करणे गरजेचे असते.

ही प्रेमाची गरज लक्षात घेवून माणसाने प्रपंचात पडावे. विवेक बुद्धी जागृत करुन त्या गोष्टीचे चिंतन मनन करीत जावे. त्या व्यक्तीवर अढळ श्रद्धा असावी. यातून प्रेमाची गरज भागली जाईल.

आता हे प्रेम येण्याची पण एक कला आहे. ती माणसाने अंगीकृत करावी.

A Will Will Find A Way!

या नियमाने सतत विचार करुन ही कला माणूस संपादन करु शकतो. विषयासक्ती कमी करुन निर्मोही प्रेम देत गेले पाहिजे.

प्रेमासाठी गोड बोलण्याची सवय ठेवा. सहानुभूती पूर्वक एखाद्याची चौकशी (खुशालीची चौकशी) करा. आपला एखाद्याला आधार वाटेल असे वागणे ठेवा. एखाद्याच्या मनामध्ये आपल्या विषयी आधार भावना निर्माण करणे ही विद्या म्हणजे खर्‍या प्रेमाची परीक्षाच होय.

प्रपंचा प्रमाणे परमार्थात पण जो पर्यंत आपण मनांतील स्वार्थ सोडून कोणत्याही प्रसंगात परमेश्वराला विसरत नाही तेव्हा तो खरा परमार्थ साधतो.

प्रपंचात काय-परमार्थात काय- खर्‍या प्रेमाची गरज दिसून येते. जो ही गरज प्रेम मिळविण्याचा अगर देण्याचा प्रयत्न करतो त्याला ही कला संपादन होते.

आयुष्य जगत असताना माणसाला प्रेमाची नितांत गरज असते. पण ते प्रेम उत्पन्न करण्याची कला प्रत्येकाने शिकून घेतली पाहिजे. ज्याने अशी करत संपादन केली तो प्रपंचात यशस्वी होतो.

प्रेमात देव पण रमतो. प्रेमा बरोबर सतत नामस्मरण करा व आनंदाने जीवन जगा.

परमेश्वराला पण साधकाच्या प्रेमाची गरज असते. प्रेमाने जग जिंका.

1 Comment

  • सो. शिला केतकर
    Posted August 19, 2022 10:30 am 0Likes

    आई आणि वडील यांचे आपल्या मुलावर असलेले प्रेम
    पती-पत्नीचे असलेले प्रेम
    या सर्व प्रेमाचे लेखकाने उदात्तीकरण करून भक्त आणि भगवंत यांच्यातील प्रेम फारच सुंदर रीतीने व्यक्त केले आहे.
    भक्तीमध्ये प्रेमाची अत्यंत जरुरी आहे आणि प्रेमामध्ये समर्पण भावना आहे
    सुंदर विचार🙏 राम कृष्ण हरी

Leave a comment