धर्म म्हणजे वागण्याची पद्धत, विचारांची दिशा, प्रवृत्ती. तत्व म्हणजे प्रणाली, आराखडा नियमावली.
जैन धर्म हा पुरातन धर्म समजला जातो. त्या धर्मामध्ये उच्च-नीच असा भाव नसतो. मानवता, माणुसकी ही जैन धर्माची प्रथम शिकवण आहे.
जिओ और जीने दो, जगा व इतरांना जगू द्या, हे जैन धर्माचे तत्व आहे.
त्याच बरोबर अणखी तत्व सांगितले आहे. माझे माझे म्हणत कोणत्याही गोष्टींशी चिटकून राहू नका, संग्रह करु नका, अपरिग्रह सांभाळा.
माझ्याप्रमाणे इतरांना पण जगण्याचा हक्क आहे. त्या हक्काचे रक्षण करा. स्वत:च्या स्वार्थासाठी इतरांना दु:खी करु नका.
या सृष्टीत असलेले एकेंद्रिय पासून पंचेद्रिय पर्यंत सर्वांत समभाव पहा, कुणाला कमी लेखू नका. स्वत:चा अहंकार वाढवू नका. मानवता वाद ध्यानात ठेवून इतरांना पण अन्न-वस्त्र-निवारा याची गरज आहे हे लक्षात घेवून गरजूंना शक्य तितकी मदत करा.
आपल्या बोलण्याने, मनाने कुणालाही दुखवू नका. कर्म करीत असताना जर न कळत कुणाचे मन दुखविले गेले तर त्याची क्षमा मागा. क्षमाशील वृत्ती ठेवा इतरांचे अपराध पोटात घालण्याची वृत्ती ठेवा.
प्रथम आपला आत्मा जो आपल्या शरीरामध्ये लपून आहे पण आपले सर्व काम तो करतो, तरीपण आपण त्याचे अस्तित्व राखत नाही, त्याची कदर करीत नाही, त्या आत्म्याची क्षमा मागा.
ज्या परमेश्वराने ही सृष्टी उत्पन्न केली व आपणास हे सर्व विनामोबदला दिले त्या परमेश्वराचे नामस्मरण सतत करीत रहा.
सर्व सृष्टीमध्ये सर्व प्राणिमात्रात तो एकच एक आत्मा आहे, हे विसरु नका.
देवगुरु, माता-पिता हे आपले दैवत समजून त्यांची पूजा करा.
दिवसात समोर येणारी प्रत्येक घटना ही आपल्या कर्माची फलशृती समजून त्या घटनेचा स्विकार करा..
हीच जैन धर्माची तत्वे आहेत.