जागतिक युवा दिन

स्वामी विवेकानंद जयंती, 12 जानेवारी हा जागतीक युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंत जयंती असते. आपल्या जन्म दिवसाचे औचित्य साधून स्वामींनी जगभरातील सर्व युवकांना हाक दिली आहे. ते म्हणतात, जागे व्हा युवकांनो जागेव्हा, तुमच्या हाती भविष्याची दोरी आहे. तेव्हा जगाच्या देशाच्या उद्धारासाठी तुम्ही तन, मन, धन अर्पण करण्याची तयारी ठेवा विवेकानंद हे राष्ट्रीय संत होवून गेले. ते युग पुरुष होते. त्यांनी ऐन तारुण्यात सन्यासाश्रमाची दिक्षा घेवून हिंदु धर्माच्या प्रचारकाचे काम त्यांनी चालू केले. असे तेजस्वी-ध्येयवादी व्यक्तीमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद होत. युवकांचे प्रेरणास्थान असणार्‍या स्वामीची चिरंतर आठवण रहावी म्हणून त्यांचा जन्मदिवस जागतिक युवा दिन म्हणून मान्य झाला.
त्यांनी युवापिढीला दिलेला संदेश –
1. उठा जागे व्हा. तुमचे ध्येयप्राप्त होईपर्यंत मार्गावर चालणे थांबवू नका. ध्येयप्राप्तीची ज्योत सतत तेवत ठेवा.
2. स्वावलंबी जीवनाची उभारणी तुम्हाला करावयाची आहे. हे थोर कार्य करण्यासाठी तुम्ही तयार व्हा.
देशावर आलेले संकट नजरेसमोर ठेवा व त्यातून बाहेर पडण्यासाठी सक्रीय व्हा. तरच देशाची प्रगती होईल. हे काम फक्त युवकच करु शकतात. तेव्हा या कामासाठी या दिवशी सर्व युवकांना शुभेच्छा.

Leave a comment