ह्रदयी धरा हा बोध खरा

या पंक्तित प्रपंचात, तारुण्यात माणसाने कसे वागावे याचे सुंदर मार्गर्शन केले आहे. नव युवकाला चांगले मार्गदर्शन केले आहे.

जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील – बिघडतील हे सांगता येत नाही. सगळचं अतर्क्य असतं.

आपण अमुक इतके दिवस जगु हे कोण सांगु शकत नाही. त्यामुळे कोणतीही चांगली गोष्ट चांगले ध्येय प्राप्त करण्यात वेळ गमवत बसू नका.

ती कामाची संधी आहे असे समजून त्या वेळेचा फायदा घ्या. हेच वचन ह्रदयी धरा हा बोध खरा यातून समोर येते.

यासाठी कोणत्याही माणसाबद्दल अपेक्षा, इच्छा आकांक्षा मनात बाळगू नका, कुणाबद्दल द्वेष ठेवू नका.

सर्वांनी आपल्याशी चांगलेच वागले पाहिजे अशी खोटी अपेक्षा ठेवू नका.

चिंतनाने राग द्वेष, मत्सर यावर संयम आणण्याचा प्रयत्न करा. शत्रुशी पण चांगले वागण्याचा प्रयत्न करा.

माणसाची पारख करण्याची कला संपादन करा. घाई गडबडीत कुणावर विश्‍वास टाकण्याचे टाळा.

कुणाचे कुणा वाचुनि न नडे, या उक्तीचे भान ठेवून कोणी सोडून गेला कोणी संगत सोडली, दूरावा ठेवला तर घाबरु नका.

अनेक माणसे संगतीत येतात, कांही सोडून जातात. पण त्यामुळे जीवन थांबत नाही, ते पुढे पुढे जातच असते.

आयुष्य फार थोडं आहे व तुझ्या जवळ असलेली ठेव (पुंजी) ती मोलाची आहे, ती ठेव तू वाया घालवू नकोस आनंदी जगणं उद्यावर सोपवू नकोस, ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम करतो ती माणसं समजा तुला सोडून गेली तर ध्यानांत घे,

धीर धरा रे धीर धरा, धीरा पोटी असती फळे मोठी, गोमटी.

धीराच्या मलमाने या जखमा पण पूर्ण भरल्या जातील.

जीवनांत काळ हे सर्वोत्कृष्ट औषध आहे. त्या काळाची वेळेची वाट बघा. घाई गडबडीने निर्णय घेऊ नका.

यशापयशाची खंत मनांत ठेवू नका, मनाचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा. ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत रहा. सृष्टीची निर्मिती शुन्यातून झाली शून्याचा अभ्यास करा, ते कुठे ठेवायचे हे मनांत ठरवा.

तू एकदा सज्ञान झालास की तुझ्या ज्ञानाने किती मोठे व्हायचे व कुठे थांबायचे याचा निर्णय तूच कर.

या जगात लॉटरीने मोठी होणारी माणसे एखाद दुसरी असतात. सर्वांचेच नशीबात लॉटरी नसते.

तेव्हा श्रीमंत होण्यासाठी शेवट पर्यंत प्रयत्नाची साथ ठेवावी लागते, ती ठेवण्याचा प्रयत्न करा.

फुकट कोणतीच गोष्ट मिळत नाही. गुंजेवीण हीत कोण सांगे याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची किंमत ओळखून त्या वस्तुला ती देण्याचा प्रयत्न करा.

कुणी आपल्यावर उपकार केले तर त्याची जाणीव ठेवून उपकाराची फेड करण्याचा विचार मनांत ठेवा, चांगली संगत ठेवा.

एखाद्याला केलेल्या मदतीची वाच्यता कोठेही करु नका. नकळत यातून तुझे देवपण सिद्ध होईल.

माता पिता गुरु यांचे ऋण कधी विसरु नका, ते तुच्या आयुष्याचे बलशाही खांब आहेत. त्यांची निगा ठेवा, तेव्हा तरुणांनो लक्षांत ठेवा हा संदेश-

ह्रदयी धरा हा बोध खरा ।

सर्वांवर प्रेम करा, स्वत:वर प्रेम करा आयुष्य आनंदाने जगा….

Leave a comment