राजा बनण्यासाठी कोणते कोणते गुण असावेत याचे उदाहरण म्हणून आंब्यांचे उदाहरण समोर घेवू.
फळामध्ये आंबा राजा मानला जातो. ज्याची पाने मंगल प्रसंगी तोरणात, हारात गुंफली जातात. ज्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत श्रमीक आपला शीण घालवितो, ज्याचा मोहर व फळे माणसाला आनंद व सुख शांती देतात, ज्याचे अस्तित्व सृष्टीची शोभा वाढविते. असा तो आंबा पिकल्यावर सर्वांना तृप्त तेचा आनंद देतो म्हणून त्याला फळांचा राजा म्हण्टले आहे.
असं राजा सारखं प्रपंचात आपण रहावं आपल्या हातून होईल त्या पटीने फुल ना फुलाची पाकळी बनून इतरांना उपयोगी पडावे.
सर्वांना तोषवीत स्वत: मानवता धर्म मनांत वाढवावा तरच प्रपंचात फळांच्या राजा आंब्या प्रमाणे प्रपंचातील राजाचा राजमुकूट तुमचे कडे येईल.
त्यासाठी कांही तत्वे लक्षात घेणे गरजेचे आहे.
1) सहकार्याचीभूमिका घ्या
2) निरपेक्ष बुद्धीने गाजा वाजा न करता परोपकार करा
3) फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा.
आंब्याच्या झाडाला दगड मारला तर ते आपणास आंबा देतो.
अज्ञानी, मुर्ख माणसांची आपणाला त्रास दिला तर त्यांना माफ करा. क्षमा वृत्ती जागृत ठेवा त्यांना चांगली बुद्धी परमेश्वर देवो अशी प्रार्थना करा तोच राजा बनू शकतो.
4) आमराईत गेल्यावर आपले डोळे शांत होते. त्याप्रमाणे प्रपंचात नेहमी शांत रहाण्याचा प्रयत्न करा
5) चिंता माणसाला चितेवर नेते म्हणून येणार्या प्रसंगाची चिंता करण्यापेक्षा चिंतन करा त्यातून तुम्हाला समाधान मिळेल.
6) क्षमा वृत्ती ठेवा क्षमा विरस्य लक्षणम्
7) शत्रुत्व भाव कमी करा
8) समजुतदार बना प्रत्येक दु:खद घटनांशी समजुतदार पणाने वागा.
ग्रीष्माच्या पडझडीनंतर पुन्हा सृष्टी फुलते. शोभायमान होते हे विसरु नका
9) आंब्या प्रमाणे स्वत:ला आनंदी अवीट बनवा
अशा या वृत्तीमुळे तुम्ही प्रपंचात राजा बनु शकता.
आंब्याची कोय लावल्यावर त्यातून आंबाच येणार हा विश्वास मनांत ठेवा व त्या राजाची काळजी घ्या.
याप्रमाणे जो स्वत: आनंदी रहातो तो फळांचे राजा प्रमाणे राजा होतो. जीवनांत यशस्वी होतो.
येथे भा. रा. तांबे यांची एक कविता आठवते ‘‘ज्याचे पल्लव मंगलपद शीणा छाया जयची हरी – गंधयुक्त फुले, फळे ही असती ज्याची क्षुघेव्या आम्रा त्या पिक, सेवती समसमा संयोग की जाहला ’’ असे आहे फळांच्या राजा आंब्याचे महत्व.
2 Comments
drsameerbhandari@gmail.com
डॉक्टरांनी आंब्याचे वर्णन फारच सुंदर केले आहे त्याची अनेक वैशिष्ट्ये त्यांनी वर्णन केली आहेत म्हणूनच याला संस्कृत मध्ये सहकार वृक्ष असे म्हणतात
परोपकारी आहे तो फळाची अपेक्षा करत नाही तो आनंदमय आहे आणि तो मंगलमय आहे आणि सर्व फळांचा राजा आहे
हे वर्णन अतिशय आवडले
आंबा या एकाच डॉक्टर साहेबांनी छान चिंतन केले आहे मला आवडले
आणि आता तोच सीझन असल्याने डोळ्यावर पुढं तो आम्रवृक्ष उभा राहिला
Sulbha Bhandari
जो इतरांचा विचार करतो आणि उपयोगी क्षेत्रों तोच खरा राजा असतो, राज्या बरोबर सर्वांच्या मनावर राज्य करतार, डांक्टरानी खुप चांगल्या पध्दतीने मांडलेले आहे. ं