परमेश्वराची भक्ती करीत असताना, त्याचे चिंतनात असताना त्याचे रुप पहाताना, त्याची प्रचिती अनेक अनेक ठिकाणी येते.
त्यातूनच त्याची अनंत नामे समोर आली व एवढ्या प्रचंड क्षेत्रात पसरलेल्या ईश्वराचे प्रेम ह्रदयी ठसले.
सकाळी उठल्यावर वर पहावे तर निरभ्र आकाश दिसते, त्याच्या विस्ताराचा विचार केला तर त्याला कुठेच सीमा दिसत नाही. जेथे तेथे तोच आहे, म्हणून त्याला आनंदा असे संबोधले आहे.
आयुष्यात कमल पुष्पाकडे पहाताना प्रपंचातील सर्व विकारातून कमळा प्रमाणे आलीप्त अशा नारायणाचे रुप दिसते. त्यामुळे त्याला कमळातील नारायणा असे संबोधिले आहे.
तो परमेश्वर कोठे आहे, असे विचारले तर कोठे नाही असे उत्तर मिळते. यावरुन त्याची व्यापकता नजरे समोर येते.
तोच प्राणीमात्रांचा आधार आहे. त्यामुळे त्याचे जनार्दन हे स्वरुप डोळ्यासमोर येते.
त्याच्या संपत्तीचा विचार करता ती कधीही कमी होत नाही व सतत आनंद देणारी असते हे लक्षांत येते.
निसर्गातील ढग ज्याप्रमाणे सतत पाणीपुरवठा करीत असतात, त्यांचा प्रवाह अखंड चालू असतो हे दर्शविण्यासाठी त्या परमेश्वराला आनंद म्हटले आहे.
तो कृपाळू असल्याचे सांगताना त्याला केशव असे संबोधले आहे.
तोच सृष्टीचा दाता आहे, हे दर्शविण्यासाठी त्याची अनेक रुपे आपणा समोर आणली आहेत.
तो सर्वांचा पालन कर्ता, पालनहार आहे हे सांगण्यासाठी त्याचे सदाशिवा हे नाम दर्शविते तेथे त्याचे शिवरुप दर्शविले आहे.
अनिष्ट गोष्टींचा बिमोड करण्यासाठी त्याची जी ताकद आहे, ती त्याचे चक्रधरा या नावाने दर्शविली आहे.
युद्धात दूर राहून करुणेच्या रथात बसून सर्वत्र करुणा करत फिरतो. असा करुणारथाचा सारथी गरुड हे ज्याचे ध्वजाचे चिन्ह आहे. हे दर्शविण्यासाठी त्याला करुणाकरा, गरुडध्वजा असे संबोधले आहे.
तो परमेश्वर किती हातांनी लोकांना मदत करतो व लोकांची रक्षा करतो. तसेच किती पायांची पायपीप करतो हे दाखविण्यासाठी त्याचे सहस्त्रकरा, सहस्त्रपाटा असे स्वरुप दाखविले आहे.
त्याची दृष्टी कशी निर्मळ आहे, हे दर्शविण्यासाठी त्याला कमलनयना या नामाने संबोधित केले आहे.
त्याचे स्वामित्व दर्शविर्यासाठी कोमल कमलांचा पती कमलापती अशी उपमा दिली आहे.
त्याचे काम, क्रोध, मद, मोह यावर मिळविलेल्या विजयाचे स्वरुप दर्शविताना कामिनी मोहिना, मदनमुर्ति अशी नांवे दिली आहेत.
प्रपंच रुपी लवण सागरात नागदेवाचे स्वरुप धारण करुन आनंदात असणार्या शेषशयनाचे रुप दाखविले आहे.
आपल्या डोक्यावर जगाचे कल्याण करण्याची जबाबदारी आहे हे दर्शविण्यासाठी त्याला भवतारक असे म्हटले आहे.
त्याची लहान मुर्ति पण आघाड किर्ती दर्शविण्यासाठी त्याला वामनमुर्ती, चिविक्रमा असे संबोधले आहे.
त्याला आपण सगुणात पाहू शकतो व तो निर्गुण निराकार होवू शकतो हे दर्शविण्यासाठी सगुणा निर्गुणा असे संबोधले आहे.
त्याचे सर्व सृष्टीमध्ये असलेले पाण्यासारखे चैतन्य दर्शविण्यासाठी त्याला जगद्जीवना असे म्हटले आहे.
तो वासुदेव पुत्र आहे हे सांगण्यासाठी वासुदेवकी नंदना असे संबोधले आहे.
लहानशा बालका प्रमाणे जो सर्वत्र रांगत रांगत फिरतो आहे हे दर्शविण्यासाठी बाळकृष्ण हे स्वरुप दर्शविले आहे.
अशा या परमेश्वराला अनंत उपमा देवून श्रावक, साधक एकच विनंती करीत आहेत.
हे परमेश्वरा तू मला तुझ्या पायाशी आसरा दे. ही माझी कळकळीची विनंती आहे.
1 Comment
सो. शिला केतकर
सर्वत्र असलेले भगवंताचे रूप
अनेक नामाने स्पष्टीकरण करून फारच सुंदर चांगले आहे
जळी स्थळी काष्ठी पाषाणी भगवंत आहेत🙏
राम राम कृष्ण हरी🙏