याचा अर्थ ‘वाट बघ’. गाडीला वेळ आहे थरळींींळपस ठेेा मध्ये आराम करा. पण आराम करता करता तेथेच थांबु नको. गाडी निघून जाईल व तु झोपेत राहशील. तेव्हा फार वाट पाहू नका, थांबू नका, संधी आली तर विवेक जागृत करा. विवेकी बना व संधीचे सोने करा. या संदर्भात साधक परमेश्वराकडे करीत असलेली एक प्रार्थना माझ्या समोर आली. ती अशी-
गजानना रे गजानना.. सुबुद्धी दे रे आमुच्या मना ।
नको दु:ख नको वेदना.. वर्षाव सुखाचा होवू दे ना ।
नको कुणाचा हेवा दावा.. मनी रुजू दे प्रेम भावना ।
गजानना रे गजानना.. सुबुद्धि दे रे माझ्या मना ।
मनोभावे करती तुझी आराधना..
या प्रार्थनेतून साधक आपल्या गतीमान दिनचर्येतून वेळ काढून परमेश्वराला सुबुद्धी देण्यासाठी प्रार्थना करीत आहे. प्रपंचात होणारे कलह, मद, मोह, माया, अहकार यांचे द्वंद्व नष्ट होऊ दे. आमच्या मनांत थांबू नये आम्ही निर्मोही बनावे अशी प्रार्थना आहे. तेथे पण ऊेप’ीं थरळीं थांबु नको, संधी दवडू नको, वेळ पुन्हा येणार नाही याची आठवण होते.
प्रपंच करीत असताना रात्रीचा दिवस करुन अविरत प्रयत्न करुन आपण प्रपंचाला उभारी आपली असते. प्रपंचाची गाडी वेगात पळत असताना अपाण धोक्याच्या पाटीकडे लक्ष दिले नाही व संगतीमुळे ऊेप’ीं थरळीं म्हणत पुढे चाललो तर गाडीचे ब्रेक कुचकामी होतील व नको ते प्रसंग समोर येतील. तेव्हा तेथे दुसरी पाटी असते. थांबा, धोक्याचे वळण, जर त्याकडे आपण ऊेप’ीं थरळीं या अविर्भावाने पाहिले तर धोका आपणच खाक. तेव्हा साधकाने विवेक जागृत ठेवून कुठे थांबयचे व कुठे न थांबता पुढु जायचे? हे ठरवायचे असते.
