यालाच विजयाचा गनिमी कावा किंवा विजयाचा जवळ्या, खुश्कीचा मार्ग म्हणतात.
जीवनात जिंकणे हे सर्वांचे व सर्वात महत्वाचे ध्येय असते. ते ध्येय कांही आकाशातून पडत नाही किंवा जादूने प्राप्त होत नाही. त्यासाठी प्रत्येकाला जीवापाड प्रत्येक श्वासागणीत प्रयत्न करावे लागतात.
कर्म करण्याच्या पदरी हार येते, तेव्हा आपणास जिंकावयाचे असेल तर गप्प बसू नका.
सतत कांहीतरी कर्म करीत रहा. त्यासाठी हृदयात एखादे ध्येय नक्की करा. घरटे बांधण्याच्या ध्येयामुळे पक्षी एक एक काडी घेऊन घरटे बांधतात तेव्हा त्यासाठी होणारे कष्ट त्यांना जाणवत नाहीत.
चांगले पीक यावे यासाठी माती बी बीयाणे पाणी, ऊन, खत या गोष्टी पहाव्या लागतात तसेच ध्येय प्राप्तीसाठी निष्ठा, प्रचंड मेहनत शिस्तबद्ध कारवाई.
हुशार व्यक्ती, प्रचंड आत्मविश्वास, वेळेचे नियोजन या गोष्टी महत्वाच्या आहेत.
यासाठी गरज आहे.
गुरुजनांच्या मार्गदर्शनाची , एकांतात बसून चिंतन करीत ध्येय प्राप्तीची योजना तयार करा. त्या योजने प्रमाणे कारवाई करण्याचा रोज प्रयत्न करा.
ध्येया शिवाय ध्येय प्राप्तीचे स्वप्न आपण पाहू शकत नाही.
आपण गरीब असू तर श्रीमंत होण्याचे, आजारी असू तर निरोगी रहाण्याची योजना करा.
अशिक्षित असू तर सुशिक्षित होण्याची योजना करा. वृद्ध किंवा जेष्ठ नागरीक असू तर वृद्धापकाळ जीवन सार्थक करण्याची योजना बनवा.
ध्येय प्राप्तीचा जवळचा मार्ग म्हणजे उठा, कामाला लागा कर्म करीत रहा. केलेले कर्म परमेश्वराला अर्पण करा.
पूर्ण शक्तिनिशी प्रगतीच्या दिशेने जीवनाच्या गाडीला धक्का मारा. गाडी सुरु होताच गाडी वेगाने पुढे जाईल गाडी पडेल, उलटी पालटी होईल, पण तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मार्गावर पुढे जाल.
येवढ्या प्रवासानंतर आत्मविश्वासाने विजय आपलाच आहे असे तोंडाने म्हणत रहा.
शेवटी वाट पहाण्याची वेळ संपली आहे हे ध्यानांत घेऊन विजयाचा छुपा रस्ता खुला झाला आहे हे जाहीर करा.
ध्येय प्राप्ती करा खुश्कीच्या मार्गाचा अवलंब करा.
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे.
1 Comment
सो. शिला केतकर
ध्येय प्राप्ती साठी कर्म करणे आवश्यक.
पक्षी आणि धान्य उदाहरण परफेक्ट.
ध्येय प्राप्ती साठी चिंतन मार्गदर्शन आणि गुरूजन जरुर
फारच छान 🙏
राम कृष्ण हरी🙏