बोलणं

बोलण्याची शक्ती हे निसर्गाने मानवाला दिलेले एक वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरवात केली की, तुम्ही कसे अहात याचा परीचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातील खरेपणा, भाव समोरच्या व्यक्ती बद्दलचा आदर, आपुलकी सारं कांही सांगुन जाते. आपली नाती, व्यवसाय सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत असे हे बोलणे इतके महत्वाचे असून आपण ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करीत नाही. ‘‘आहे हे असं आहे, माझा आवाज मोठा आहे मला अशीच सवय आहे असे म्हणत आपण त्या बोलण्याचे समर्थन करतो. असे हे बोलणं आपण आयुष्यभर शिकावं लागतं. सावकाश बोलणे स्पष्ट बोलणे, शक्य तो हळू बोलणे या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात. वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसुर होतात व नेमकं, मोजकं बोलता येतं शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्याचा रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी वाचन, काव्य वाचन महत्वाचे आहे. कानांत प्राण आणून ऐकावं अशी माणसे या जगात आहेत. फक्त शोधता ऐकता आली पाहिजेत. बोलण्यात पाल्हाळपणा नसावा. आपल्या माणसाची बोलताना ताण हलका होतो. बोलणं म्हणजे निव्वळ शब्द थोडेचं असतात. न बोलता शांत सोबत ही बोलणच असतं. वेळात वेळ काढून घरात संवाद (बोलणं) झालं पाहिजे माणसा माणसातील अंतर हे बोलण्यानेच दूर होवू शकते.
मनातील गैरसमज हे बोलण्याने दूर करता येतात. पण या आधी कसं बोलायचं हे या जगाच्या शाळेत शिकावच लागतं. जगण्याचा प्रवास अवघड आहे. बोलणारं भेटलं की प्रवास सुखाचा होतो ज्याच्या वाचेत माधुर्य व गोडवा आहे. जो सदैव संयमित व विनयशील बोलतो दुनिया त्याचे प्रेमात पडते. अशी व्यक्ती अशक्य ते शक्य करु शकते ते रसाळ बोलणे तसा प्रयत्न करावा.

Leave a comment