भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

हे ऐक संत वचन आहे. हे खरे करण्यासाठी अनेक संतांनी जन्म घेतला व अडचणीत असणार्‍या साधकाच्या पाठीशी उभा राहून त्याला दिलासा दिला.
प्रपंचात काय किंवा परमार्थाने काय ठिक ठिकाणी या संत वचनाची आठवण होते. ‘‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ’’
प्रपंचात जेव्हा बालक जन्म घेते व चालू लागते. त्याला पडण्याची भिती वाटत असते, तेव्हा त्याची आई त्याला सांगत असते तू चाल, मी तुझ्या पाठीशी आहे, या एका वाक्याने त्याचे पायात ताकद येते व तो आयुष्यभर चालत रहातो. केवढी शक्ती आहे या वाक्यात !
परमार्थात गीते मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगत आहेत. अर्जुना हताश होवू नकोस हे सर्व नातेवाईक शत्रुम्हणून तुझ्या समोर उभे आहेत. तेव्हा तुला मदत करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे.
प्रपंचात संकटे तर क्षणोक्षणी येत असतात, त्यावेळी कोणीतरी (हरि) होवून पाठीमागे उभा रहातो व म्हणतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे. या एका वाक्यावर तो साधक प्रपंचात उंच उंच उड्या मारत असतो. ज्यावेळी हे वाक्य डॉक्टरांच्या तोंडून बाहेर पडते तेव्हा नातेवाईक निवांत होतात व त्यांची भीती दूर होते.
परमार्थामध्ये पण ज्यावेळी अनुसंधान ठेवून नित्यनियमाने जेव्हा साधक साधना करीत असतो. त्यावेळी परमेश्‍वर त्याला ‘‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ’’ असे म्हणतो. ज्ञानदेवाना ज्यावेळी अडचणीत आणले व या रेड्याच्या मुखातून गीता वदवायास सांगितले तेव्हा परमेश्‍वराने ज्ञानदेवास भिऊ नकोस मी त्याच्या तोंडून गीता वदवीतो असे सांगितले. येथे ही या वचनाची प्रचिती येते. परमेश्‍वरावर अगाध श्रद्धा ठेवणार्‍या साधकाला तो हरि कानांत हा मंत्र सांगतो, ‘‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ’’

Leave a comment