अत्युच्च पदी थोर ही बिघडतो, हा बोल आहे खरा

नाव मोठे लक्षण खोटे.

नाव सुवर्णा हाती कथलाचा वळा.

अश्या बर्‍यास म्हणी डोळ्यासमोर आल्या तेव्हा लक्षांत आलं जगात नावाप्रमाणे कांहीच दिसत नाही.

दिसतं तसं नसतं म्हणून सारं जग फसतं.

या संदर्भात कृष्णा शास्त्री चिपळूणकर यांची एक कविता आठवली ती अशी

देखुनी उद्या तुझ्या द्विजकुळे,

गाती अती हर्षुनी शार्दुलादिक

सर्व दुष्ट दडती,

गिया तरी जाऊनी देशी ताप,

तरी जसा वरवरी येशी नभी भास्कर,

अत्युचि पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा

घरांत एखादा बालक जन्म घेतो सर्वजण त्याचे कौतुक करतात त्याला लाडाने वाढवून कौतुक करत करत मोठा करतात. जस जसा तो मोठा होत जातो तसं तसे त्याला संकटाशी मुकाबला करावा लागतो.

तेथे त्याचे लक्षांत येते की मोठेपण खरे नाही. मोठे होण्यासाठी लांड्या लबाड्या कराव्या लागतात. तरुणपणांत पैसा मिळवून मोठे होणे एवढेच त्याचे ध्येय असते व ते गाठण्यासाठी त्याला अनेक कुप्त्या कराव्या लागतात, अनेक सोंगे घ्यावी लागतात. लोकांची पिळवणूक करावी लागते. त्याशिवाय त्याला मोठेपण मिळत नाही.

तसेच निसर्गाकडे पहाताना लक्षात येते की सूर्य तळपत तळपत आकाशात मध्यांनीला माथ्यावर येतो अति उच्च पदी येतो तेथे तो सर्वांना हैराण करुन सोडतो तेथे त्याचा अहंकार वाढलेला असतो.
हे सर्व बघतिल्यावर वाटते अत्युच्चपदी थोर ही बिघडतो हा बोल आहे खरा. आपण मात्र जीवनांत हा बोल खोटा करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.

प्रपंचात मोठे कुठपर्यंत व्हायचे याचे भान ठेवले पाहिजे. नको म्हणण्याची सवय केली पाहिजे. इतरांंचे सुख दु:खात सहभाग घेतला पाहिजे. सर्वजण सुखी होवोत ही प्रार्थना केली पाहिजे.

राज्याधिकार येवो किंवा जावो, समस्त धनमान ढळो ना ढळो, समाधान ही ब्रम्हचैतन्य महाराजांची सांगितलेली उक्ती. जो आचरण्यात आणतो तो अत्युच्ची पदी बिघडतो ही उ्क्ती फोल करु शकतो.

तसा आपण प्रयत्न करु या.

1 Comment

  • सो. शिला केतकर
    Posted June 9, 2022 9:35 pm 0Likes

    खरे आहे डॉक्टर साहेब
    उच्च पदाला गेल्यानंतर आपला अहंकार बाजूला ठेवून आणि आपला स्वार्थ बाजूला ठेवून आपली वर्तणूक ठेवली तर महाराज म्हणतात त्याप्रमाणे
    ही उक्ती आपण ठरवू शकतो

    पण आज पाहिले तर मोठे मोठे लोक चांगले शिकले सवरलेले पण मोठ्या पदावर गेले की स्वार्थ आणि करप्शन मध्ये सापडतात
    त्यांची सर्व तत्व बाजूला ठेवतात आणि मग हे वचन सत्य होते

    छान विचार
    सुर्याचे उदाहरण परफेक्ट

Leave a comment