आत्मविश्वास

प्रपंच करीत असताना, आपण बालपणापासून कुणावर तरी विश्वास ठेवून वागत असतो.

शेळ्या मेंढ्या सुद्धा साथीदारावर विश्वास ठेवून त्यांचे मागोमाग चालत असतात.

तेव्हा विश्वास हे सूत्र सर्व ठिकाणी महत्वाचे असते.

आता जसा आपण इतरांवर विश्वास टाकून निवांत वाटचाल करतो, तसा आपल्या स्वत:वर विश्वास टाकून प्रपंचात का वागत नाही?

असा प्रश्‍न उभा रहातो, इतरावर विश्वास टाकताना आपण त्याची पूर्ण माहिती घेतो, चौकशी करतो, त्यावर बारीक विचार करतो व मग शांतपणे त्यावर विश्वास टाकतो.

तसे आपण आपले स्वत:चे चिंतन करीत नाही. आपण कोण आहोत ? कोठून व कशासाठी जन्माला आलो? आपले ध्येय काय? याचा आपण विचारच करीत नाही.

याचा अर्थ आपल्या आत्म्याचा विचार करीत नाही.

तेथे त्यावर विश्वास आत्मविश्वास कसा ठेवणार?

तो ठेवण्यासाठी प्रथम प्रत्येकाने स्वत:ची ओळख करुन घेतली पाहिजे, ध्येेय निश्‍चिती केली पाहिजे.

त्यावर चिंतन अभ्यास केला पाहिजे व मग त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

याला आत्मविश्वास म्हणतात.

कर्म आणि प्रपंच ही दोन प्रपंचाच्या गाडीची चाके आहेत.

फक्त कर्म घेवून प्रपंचाची गाडी चालत नाही, तर प्रपंच चांगला करीत करीत गाडी पुढे न्यायची असते.

गाडीवानाच्या हातात कासरा असतो.

तो कासरा म्हणजे विवेक बुद्धी .

आपण मात्र त्या विवेकाला दुर्लक्ष करुन इतरांवर विश्‍वास टाकून आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतू तेथे तो प्रयत्न फसतो. प्रपंचाची गाडी तेथे अडते.

ती गाडी परत सुरु करण्यासाठी गाडीवानाजवळ विश्वास हवा तो पक्का हवा.

याच विश्वासावर बालपणी मी चालायला लागलो. तरुणपणांत उद्योग करु लागलो.

शिकत असताना उच्चपदवी घेवू शकलो. प्रपंचातील सर्व गरजा पूर्ण करु शकलो.

पण जस् जसं मला यश मिळत गेलं तस् तसं त्या पाठीमागील यशस्वी पाठराखा मी पूर्ण विसरुन गेलो.

मला ज्ञान देणार्‍या गुरुवरील विश्वास निघुन केला. मी एकाकी झालो. तेथे विचारांची दिशा नकारात्मक होवू लागली.

मी चिंतन करु लागलो. तेथे माझ्या ध्यानात आले, ते असे. नेहमी आपणाला साथ देणारा, आपल्या यशात नेहमी पाठीराखा असणारा आपला मित्र नाराज आहे व तो आपल्याला सोडून दूर गेला आहे.
माझी चूक माझे ध्यानांत आली मग माझी धावपळ सुरु झाली. त्याला पत्तापण लागला पण वेळ निघून गेली होती.

तेथे मी परत भक्तीने, प्रेमाने त्याची आळवणी केली त्याला कळवळून साद घातली, तसा तो गुपचूप माझ्या ह्रदयात येऊन बसला.

ह्रदय शुद्धी करत करत त्याने माझी मनशुद्धी केली. राग, लोभ, द्वेष, आसक्ती यांची गच्छंती केली.

आता मी व तो (आत्मविश्वास) असे दोघेच प्रपंचात राहिलो.

आम्ही दोघांनी परमेश्‍वरा समोर जावून एकत्र रहाण्याच्या आणाभाका घेतल्या.

आयुष्यात पुन्हा कधी आपली जोडी दुभंगू नये अशी प्रार्थना केली.

आत्मविश्वास प्रकट केला . त्याचे फळ दिसू लागले.

त्या फळाने जीवन सुखी समाधानी झाले म्हणून म्हणतो.

आयुष्यात आत्मविश्वास महत्वाचा आहे.

Leave a comment