अथर्वशिर्ष

शिर्ष याचा अर्थ डोके, थर्व म्हणजे हलणारे व अथर्व म्हणजे स्थिर असणारे.

अथर्वशिर्ष याचा अर्थ स्थिर बुद्धी असलेले मस्तक. अथर्वशिर्ष हे एक स्त्रोत्र आहे.

याची रचना गणक ऋषिंनी केली आहे. या स्त्रोत्राचे पठणाने मन व बुद्धी स्थिर होते. अशी गणेश उपासकांची श्रद्धा आहे.

स्थिर आणि निश्‍चयी बुद्धीने केलेले काम नेहमी यशस्वी होते. आत्मविश्‍वास वाढतो, माणूस नम्र होतो, आत्मविश्‍वास वाढतो. असा माणूस अडचणीतून संधी शोधतो, तर अपयशी होणारी माणसे अडचणी सांगत बसतात.

आपल्या मनाची ताकद वाढविणे आपल्याच हातात आहे. मन ही एक विलक्षण गोष्ट आहे. मन कणखर तर आपण कोणत्याही संकटावर मात करु शकतो. त्यासाठी आपण वर्तमानात स्थिर बुद्धी ठेवून जगले पाहिजे.

स्वप्नांच्या भ्रमात राहून भ्रम निराशा टाळावी यासाठी मस्तक स्थिर राखावे व हे काम अथर्वशिर्ष या स्त्रोत्राचे पठणाने होते. अशी ही वर्तमानात जगण्याची कला जो माणूस प्राप्त करतो त्याला अथर्वशिर्ष समजले असे मला वाटते.

अथर्वशिर्ष हे गणेशाला उद्देशुन तयार केलेल स्त्रोत्र आहे. गणेश म्हणजे या विश्‍वातील निसर्ग. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश या पंचमहाशक्ती आहेत व हा निसर्ग म्हणजे ईश्‍वर आहे. या ईश्‍वराला आपण जपले पाहिजे. तरच(ईश्‍वर) निसर्ग आपल्याला जपेल, म्हणजेच पर्यावरण साधेल.

अथर्वशिर्षाचा सोपा मराठीत अर्थ असा‘हे देव हो, आम्हाला कानांनी शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी चांगले पहावयास मिळो, सुदृढ अवयवांनी, शरीरानी निसर्गातून प्राप्त झालेले आयुष्य परमेश्‍वरा तुझ्याच स्मरणात, स्तवनात व्यतीत होवो.

सर्वश्रेेष्ठ इंद्र आमचे रक्षण करतो, ज्ञानवान सूर्य आमचे कल्याण करतो, संकटांचा नाश करणारा गरुड ध्वजावर रक्षण करीत बसला आहे, ब्रहस्पती आमचे कल्याण करतो, अशा या ॐकार रुपी गणेशाला नमस्कार.

तूच सर्वांचा कर्ता, सृष्टीचा धारणकर्ता आहेस, पोषण करणारा आहेत. तूच त्याज्य गोष्टींचा हरण कर्ता आहेस. दाही दिशांनी होणार्‍या प्रापंचिक हव्यापासून तूच आमचे रक्षण कर.
तू सत्व, रज, तम गुणांचे पलीकडचा आहेस. तू स्थूल, सूक्ष्म आणि अनंत या तीन देहा पलीकडचा आहेस.

तू भूत, वर्तमान आणि भविष्य या तिनही काळाच्या पलीकडचा आहेस. तू सृष्टीचा मूळ आधार म्हणून स्थिर आहेस तू उत्पत्ती, स्थिती आणि तुच या तिनही शक्तीच्या पलीकडचा आहेस.

योगी लोक सतत तुझे ध्यान करीत असतात.’
अशा या गणक ऋषिंनी रचनेच्या अथर्वशिर्ष या स्त्रोत्राला मी अभिवादन करतो.

Leave a comment